घरताज्या घडामोडीगोधन न्याय योजनेचा पडला भार, शंभर किलो शेण घेऊन चोर पसार!

गोधन न्याय योजनेचा पडला भार, शंभर किलो शेण घेऊन चोर पसार!

Subscribe

छत्तीसगढ सरकारने शेणासंबंधीच्या योजनेची घोषणा करताच राज्यात एक अजब प्रकार समोर आला आहे. येथे एका शेतकऱ्याच्या घरातून चोरांनी सुमारे १०० किलो शेण चोरलं आहे. कोरिया जिल्ह्यातील एका गावात दोन शेतकऱ्यांनी एका वाड्यात एकत्र करून ठेवलेलं सुमारे शंभर किलो शेण चोरांनी चोरून नेलं. शेतकरी जेव्हा सकाळी उठून त्याच्या वाड्यात गेला तेव्हा शेणाचा मोठा ढीग गायब होता.

आपण साठवलेल्या शेणाची चोरी झाल्याचे पाहून शेतकरी हैराण झाला. त्याने या संदर्भात स्थानिक समितीसह पोलीस ठाण्यातही तक्रार केली. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शेण चोरी होण्याची ही नवी समस्या आहे. ती रोखण्यासाठी चोरांना पकडणे आवश्यक आहे.

- Advertisement -

काय आहे योजना

छत्तीसगढमध्ये भूपेश बगल यांच्या नेत्तृत्वाखाली काँग्रेस सरकारने गोधन न्याय योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार पशुपालकांकडून शेण खरेदी करेल, ज्यांचे त्यांना पैसे दिले जातील. या योजनेअंतर्गत पशुपालकांकडून २ रूपये प्रति किलो दराने शेण खरेदी करेल. सरकारचे म्हणणे आहे की, जर पशुपालकाला सेंटरमध्ये जाऊन शेण विकायचे नसेल तर तो घरातून सुध्दा विकू शकतो.


हे ही वाचा – आली आली रशियाची कोरोना लस आली; पुतिन यांनी केली घोषणा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -