नुपूर शर्मांबद्दल प्रक्षोभक वक्तव्य; अजमेर दर्ग्याच्या खादिमला अटक

भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याबद्दल प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल अजमेर दर्ग्याचा खादिम सलमान चिश्ती याला पोलिसांनी काल रात्री अटक केली.

अजमेर : भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याबद्दल प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल अजमेर दर्ग्याचा खादिम सलमान चिश्ती याला पोलिसांनी काल रात्री अटक केली, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक विकास सांगवान यांनी दिली. सलमान चिश्ती याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून भाजपाने त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. नुपूर शर्मा यांचा शिरच्छेद करणाऱ्याला आपण आपले घर देण्याचे सलमान चिश्तीने जाहीर केले होते. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे अजमेर शहराच्या अलवर गेट पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून पोलिसांनी सलमान चिश्ती याला मध्यरात्री 12.45च्या सुमारास अटक केली.

हेही वाचा – मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम, ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले. त्याला काहींनी समर्थन दिले आहे. त्यातूनच अमरावतीमध्ये उमेश कोल्हे तर, उदपूरमध्ये शिवणकाम व्यावसायिक कन्हैयालाल यांची हत्या झाली होती. कन्हैलाल यांच्या हत्येआधी हल्लेखोरांनी जो व्हिडीओ तयार केला होता, त्या आणि सलमान चिश्तीच्या व्हिडीओची भाषा एकसारखी असल्याचे आढळले आहे. त्याअनुषंगानेही तपास करण्यात येत आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली शरद पवारांची भेट; तर्कवितर्कांना उधाण