Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तानी समर्थकांचा हल्ला

ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तानी समर्थकांचा हल्ला

Subscribe

लंडन – ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयावर खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केला आहे. तोडफोड करत त्यांनी भारतीय तिरंग्याचाही अपमान केल्याचे समोर येत आहेत. तसंच, भारताचा झेंडा खाली घेत त्यांनी खलिस्तानी झेंडे फडकवले आहेत. भारताने याप्रकरणाचा निषेध व्यक्त करून कारवाईची मागणी केली आहे.

खलिस्तानी समर्थक अमृतपाल याला पंजाब पोलिसांनी अटक केल्याची वार्ता पसरल्यानंतर लंडनमधील खलिस्तानी समर्थकांनी भारतीय उच्चायुक्त कार्यालयावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. भारताने या घटनेची गंभीर दखल गेतली असून भारताने परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, लंडनमधील भातीय उच्चायुक्तावरील हल्ला निंदनीय आहे. याप्रकरणी ब्रिटेनच्या सर्वोच्च राजनैतिक अधिकाऱ्याला दिल्लीत पाचारण करण्यात आली असून याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच, भारतीय उच्चायुक्तालयापुढे पुरेसा बंदोबस्त नसल्याचीही तक्रार भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने निवदेनाद्वारे केली आहे. तसच, या हल्ल्यासंदर्भात चर्चा करण्याकरता ब्रिटेनच्या वरिष्ठ राजनितैकासोबत आज सायंकाळी उशिरा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनीही ट्वीट करून याबाबत निषेध व्यक्त केला आहे. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालय संकुल आणि तेथील लोकांविरुद्धच्या आजच्या घृणास्पद कृत्यांचा मी निषेध करतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

खलिस्तानवाद्यांना पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय संघटनेचे पाठबळ आहे. त्यामुळे आयोएसआयच्या इशाऱ्यावरूनच खलिस्तानी समर्थकांनी उच्चायुक्तालयावर हल्ला केल्याचं म्हटलं जात आहे. अमृतपाल याला अटक झाल्या वृत्तानंतर पाकिस्तानी नागरिकांनी भारताविरोधात आंदोलन छेडलं आहे. एवढंच नव्हे तर कॅनडा आणि अमेरिकेतही अमृतपाल सिंह याचे समर्थक आहेत.

- Advertisement -

दरम्यान, वारिस दे पंजाब संघटनेचा म्होरक्या अमृतपाल सिंग याला अटक केल्याचे वृत्त आहे. परंतु, पोलिसांनी दावा फेटाळून लावला आहे. तर, वारिस दे पंजाबच्या समर्थकांनी त्याला अटक केल्याचं म्हटलं आहे. शनिवारी पोलिसांनी अमृतपाल सिंग याच्या सहा साथीदाऱ्यांना ताब्यात घेतलं. मात्र, अमृतपाल तेव्हा पोलिसांच्या हातातून निसटला. तेव्हापासून तो फरार आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे. परंतु, अमृतपाल सिंग सध्या पोलिसांच्या अटकेत असल्याची दावा त्याच्या समर्थकांनी केला आहे.

- Advertisment -