नवी दिल्ली: खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा व्हिडिओ जारी करून धमकी दिली आहे. पन्नूचा हा व्हिडिओ भारतातील अहमदाबाद येथे होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या फायनलशी संबंधित आहे. खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये ‘शटडाऊन वर्ल्ड कप’ सारख्या गोष्टी बोलत आहे. (Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannu s Kolhekui again Threat again regarding Cricket World Cup 2023)
ISI कडून लिखित स्क्रिप्ट
गुरुपतवंत सिंग पन्नू हा भारताविरोधात सतत गरळ ओकत असतो तसे व्हिडिओही जारी करत असतो. अनेकवेळा त्याने आपल्या व्हिडीओमध्ये भारताला धमक्या दिल्या आहेत. पण यावेळी पन्नूने जो व्हिडिओ जारी केला आहे त्यात पन्नूने सांगितलेल्या गोष्टी पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या सूचनेनुसार सांगितल्या असल्याचं दिसून येत आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओवरून लक्षात येतंय की पन्नू पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI च्या K-2 डेस्कवरून लिहिलेली स्क्रिप्ट वाचत आहे आणि व्हिडिओ रिलीज करत आहे.
क्रिकेट विश्वचषकासंदर्भात भारताला धमकावणारा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. पन्नूने अहमदाबादमध्ये होणाऱ्या विश्वचषकासंदर्भात एक व्हिडिओ जारी केला आहे आणि व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा धमकीची भाषा केली आहे. विश्वचषक शटडाऊन अशा घोषणा त्याने व्हिडीओमध्ये दिल्या आहेत. पन्नू 1984 शीख हत्याकांड आणि गुजरात दंगलीचा हवाला देऊन शीख आणि मुस्लिमांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाही तर या व्हिडिओमध्ये तो गाझाबाबत भारताच्या भूमिकेवर खोटा प्रचार करत आहे. याच्या नावाखाली भारतातील मुस्लिमांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
भारतावर नव्या पद्धतीने आक्रमण करण्याचा नवा कट आहे का?
पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी आयएसआयने भारतात दहशतवाद आणि अशांतता पसरवण्यासाठी एक स्वतंत्र डेस्क तयार केल्याचा दावा केला जात आहे. ज्यामध्ये आयएसआयचे अधिकारी, भारतातून पळून गेलेले खलिस्तानी आणि काश्मिरी दहशतवादी पाकिस्तानात बसले आहेत. यामध्ये K-2 म्हणजे खलिस्तान-काश्मीर. ISI अधिकारी खलिस्तानी दहशतवादी आणि काश्मिरी इस्लामिक दहशतवाद्यांना एका व्यासपीठावर आणून भारतात अनेक प्रकारचे दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट रचण्यात गुंतले आहेत.