Homeदेश-विदेशBhagwant Mann : बॉम्बने उडवून देऊ, खलिस्तानी दहशतवादी पन्नूची पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना धमकी

Bhagwant Mann : बॉम्बने उडवून देऊ, खलिस्तानी दहशतवादी पन्नूची पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना धमकी

Subscribe

एक व्हिडीओ जारी करत गुरपतवंत सिंग पन्नूने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांची अवस्था माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांच्यासारखी होईल. आपण त्यांना बॉम्बने उडवू असा इशारा दिला आहे.

नवी दिल्ली : सुरक्षा यंत्रणांनी तीन दिवसांपूर्वीच पंजाब पोलिसांना मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर दहशतवादी हल्ल्या होणार असल्याची सूचना दिली आहे. टिफिन, ड्रोन किंवा महिला मानवी बॉम्बच्या माध्यमातून हा हल्ला होऊ शकतो, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. अशातच खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. एक व्हिडीओ जारी करत पन्नूने भगवंत सिंह मान यांची अवस्था माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांच्यासारखी होईल. आपण त्यांना बॉम्बने उडवू असा इशारा दिला आहे. (Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannu threatens Punjab Chief Minister Bhagwant Mann)

पन्नूने एक व्हिडिओ जारी करताना म्हटलेकी, भगवंत मान यांची अवस्था माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांच्यासारखी होईल. यासाठी फरीदकोट रेल्वे स्टेशन आणि नेहरू स्टेडियमवर खलिस्तानी घोषणा लिहून ठेवाव्यात. याठिकाणी भगवंत मान 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करणार आहेत. त्यादिवशी शीख तरुणांनी कंबरेला बॉम्ब बांधू नये किंवा हातात तिरंगा धरू नये. त्यांनी फक्त खलिस्तानचा झेंडा हातात धरावा. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार आता सत्तेवर आले आहे. सरकार बदलले की बऱ्याच गोष्टी बदलतात, असे पन्नूने म्हटले आहे.

हेही वाचा – ECI Foundation Day : भारतातील मतदारांची संख्या 99.1 कोटींवर, निवडणूक आयोगाची माहिती

गुरपतवंत सिंग पन्नू याने म्हटले की, पंजाब हा भारताचा भाग नाही. त्यामुळे पंजाब-हरियाणा सीमेवर बसलेल्या पंजाबमधील तरुणांनी आणि शेतकऱ्यांनी अमृतसर, गुरुदासपूर आणि जालंधर सारख्या जिल्ह्यांमधील डीसी कार्यालयांवर खलिस्तानचे झेंडे फडकावावेत, जेणेकरून पंजाबमधील संदेश थेट अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचेल. कॅनडा, ब्रिटन, इटली, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील वॉशिंग्टन डीसी, सॅन फ्रान्सिस्को, टोरंटो, ओटावा, व्हँकुव्हर येथील दूतावासांमध्ये खलिस्तानचे झेंडे फडकवावेत. असे केल्याने तेथील स्थानिक सरकार आणि विशेषतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना संदेश जाईल की, धर्म आणि राजकारणाबाबत शीख व भारत सरकारमध्ये मोठा फरक आहे, असेही पन्नूने म्हटले.

पंजाबमध्ये खलिस्तान जिंदाबादचे नारे 

दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, आज सकाळी फरीदकोटच्या नेहरू स्टेडियम आणि रेल्वे स्टेशनच्या फूट ओव्हर ब्रिजवर खलिस्तान जिंदाबादचे नारे लिहिण्यात आले होते. तसेच खलिस्तान जिंदाबादचे झेंडेही फडकवण्यात आले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हा पोलिसांना तातडीने कारवाई केली. तसेच अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यानंतर दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने मुख्यमंत्री भगवंत मान यांना धमकी देणारा एक व्हिडीओ जारी केला आहे. यात त्याने फरीदकोटमध्ये खलिस्तान जिंदाबादचे नारे लिहिण्यात आल्याचा उल्लेख केला आहे. गुरपतवंत सिंग पन्नूने धमकी दिल्यानंतर आता प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री फरीदकोटमध्ये तिरंगा फडकवणार नाहीत. तसेच ते प्रजासत्ताक दिनी कुठे तिरंगा फडकवणार, हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

हेही वाचा – Bangladesh Crisis : बांगलादेशात सत्तापालट होऊनही परिस्थिती जैसे थेच, विद्यार्थी नेत्यांना पश्चाताप