घरदेश-विदेशKhargone bus accident : प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून 50 फूट खाली कोसळली;...

Khargone bus accident : प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून 50 फूट खाली कोसळली; 22 जणांचा मृत्यू

Subscribe

नवी दिल्ली : मध्यप्रदेशातील खारगोन जिल्ह्यातील बोराड नदीवरील पुलावरून प्रवाशांनी भरलेली बस 50 फूट खाली पडून मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात आतातपर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. (Khargone bus accident)

बस क्रमांक MP10-P-7755 ही मां शारदा ट्रॅव्हल्सची बस खारगोन जिल्ह्यातून इंदूरला जात असताना खारगोन-ठीकरी मार्गावरून जात असताना दसंगा गावाजवळ हा अपघात झाला. बस नदीवरील पुलावरून तब्बल 50 फुट खाली अचानक पडली असून या बसमध्ये 40 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. बस पडल्यानंतर मोठा आवाज झाल्यानंतर स्थानिक नागरिकांना पोलिसांना यासंदर्भात माहिती देत बचाव कार्यात मदत केली. त्यांनी सांगितले की, या मार्गावरून बसेस दररोज भरधाव वेगाने जातात. अनेकवेळा आम्ही बसचालकांना अडवले असता त्यांनी दादागिरी केली आहे. बोराड नदी कोरडी असल्यामुळे आतापर्यंत मृतांची संख्या 15 झाली आहे. जर नदीत पाणी असते, तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता होती.

- Advertisement -

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी खारगोन बस दुर्घटनेवर दु:ख व्यक्त करताना मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केले आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले की, ही अत्यंत दुःखद घटना असून या अपघातासाठी दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ते म्हणाले की, या अपघातानंतर अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले असून मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर 25 जण हून अधिक जण जखमी झाले आहेत, अशी माहिती दिली होती. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मध्यप्रदेश सरकारकडून आर्थिक मदत जाहीर
खारगोन येथील बस अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबाना मध्यप्रदेश सरकारकडून 4 लाख रुपये, गंभीर जखमींना 50 हजार रुपये, किरकोळ जखमींना 25 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय अपघातातील जखमींवर योग्य उपचाराची व्यवस्थाही सरकारकडून करण्यात येणार आहे.

- Advertisement -

खलघाट बस अपघातात कोणीही वाचले नव्हते
गेल्या वर्षी 17 जुलै 2022 रोजी धार आणि खरगोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या नर्मदा नदीच्या खलघाट पुलावरून एक प्रवासी बस पाण्यात पडली होती. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला होता. खलघाट येथील दुपदरी पुलावर एका वाहनाला ओव्हरटेक करताना महाराष्ट्र रोडवेज बसचे नियंत्रण सुटल्यामुळे बस नदीत कोसळली होती. बस इंदूरहून महाराष्ट्रातील आमनेरला जात होती. ही बस पुलावरून 25 फूट खाली कोसळली. चुकीच्या दिशेने येणाऱ्या मोटारसायकल स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -