Homeक्रीडाKhel Ratna Award : डी गुकेश, मनू भाकरला खेलरत्न जाहीर; 17 जानेवारीला...

Khel Ratna Award : डी गुकेश, मनू भाकरला खेलरत्न जाहीर; 17 जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

Subscribe

नवी दिल्ली : दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर आणि जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश हे यांना नुकताच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. गुरुवारी (2 जानेवारी) क्रीडा मंत्रालयाने याबाबत घोषणा केली आहे. याआधी देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी काही नावे जाहीर करण्यात आली होती. यावेळी ऑलिम्पिक पदक विजेत्या मनू भाकरचे नाव नसल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, आता खेलरत्नसाठी तिच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. (Khelaratna award declared to Manu Bhaker and D Gukesh)

हेही वाचा : Jasprit Bumrah : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बुमराहने रचला इतिहास; केला हा विक्रम 

देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार म्हणून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराकडे पाहिले जाते. 17 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवनमध्ये आयोजित एका विशेष समारंभात पुरस्कार विजेत्यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी या पुरस्कारासाठी भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत आणि पॅराथलीट प्रवीण कुमार यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. पण यावेळी दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकरच्या नावाची शिफारस न केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. स्वतः मनू भाकरने याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती. पण आता मात्र तिच्या नावाने पुरस्कार जाहीर झाला आहे. मनू भाकरसोबतच नुकतेच जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावणाऱ्या डी गुकेशलादेखील यंदाचा खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच, भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत आणि पॅराथलीट प्रवीण कुमार यांनादेखील खेलरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज मनू भाकरने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्ण पदक पटकावले होते. तर, त्यानंतर सरबज्योत सिंगसह 10 मीटर मिश्र प्रकारात कांस्यपदक पदक पटकावले होते. याचसोबत, ऑलिम्पिकच्या इतिहासात एकाच वर्षी दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. तसेच, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वात भारतीय संघाने दुसऱ्यांदा कांस्यपदक पटकावले. यावेळी संपूर्ण स्पर्धेत हरमनप्रीतने सर्वोत्तम कामगिरी केली होती. तसेच, उत्तर प्रदेशच्या प्रवीण कुमारने पॅरिस पॅरालीम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडी-T64 स्पर्धेत आशियाई विक्रम मोडत सुवर्ण पदक पटकावले होते.