घरदेश-विदेश‘Kill Narendra Modi’; NIA कडे पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याच्या धमकीचा E-Mail

‘Kill Narendra Modi’; NIA कडे पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याच्या धमकीचा E-Mail

Subscribe

एनआयएने केंद्रीय गृहमंत्रालयाला दिली माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे समोर आले आहे. टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएच्या हाती एक ई-मेल लागला असून त्यामध्ये किल नरेंद्र मोदी असे नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात एनआयएने केंद्रीय गृहमंत्र्यालयाला पत्र पाठवले असल्याचेही समजते.

या ई-मेलमध्ये केवळ तीन शब्दच लिहिले आहेत. ‘किल नरेंद्र मोदी’ (Kill Narendra Modi) असा उल्लेख या ई-मेलमध्ये आहे. याबाबत एनआयएने केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून सतर्क केले असून गृहमंत्रालयाने याबाबत एसपीजीलाही माहिती दिली. एसपीजीवर पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींविरोधात कट रचला जात असल्याचे या ई-मेलमधून दिसून येत आहे. मोदींच्या जीवाला धोका असल्याचे ई-मेलमधील माहितीतून स्पष्ट होत आहे. त्यामुळेच सुरक्षा यंत्रणांनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाला माहिती दिली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. या ई-मेलसंदर्भात एनआयएने कोणतीही चौकशी अद्याप केलेली नसून सर्वात आधी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाला कळवण्यात आलं आहे.

एनआयएने गृहमंत्रालयाला पाठवले असे पत्र

“एनआयएकडे आलेल्या काही ई-मेलमध्ये काही मान्यवर व्यक्तींना तसेच संस्थांना धमकी देण्यात आली आहे. या ई-मेलच्या कॉपी आणि माहिती सोबत जोडत आहोत. यासंदर्भात योग्य ती कारवाई करावी,” असे एनआयएने गृहमंत्रालयाला पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

नेमके काय म्हटले आहे E-Mail मध्ये…

टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार हा ई-मेल [email protected] या ई-मेल आयडीवरुन मुंबईतील एनआयच्या ई-मेलआयडीवर पाठवण्यात आला आहे. हा ई-मेल रात्री १ वाजून गेल्यानंतर पाठवण्यात आला आहे. या ई-मेलमध्ये Kill Narendra Modi असा तीन शब्दांचा मजकूर आहे.

या प्रकरणामध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसाठी जबाबदार असणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपला माहिती दिली आहे. तर हा ई-मेल समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. रॉ, गुप्तचर यंत्रणा, संरक्षण गुप्तचर यंत्रणा एनआयएच्या संपर्कात आहे. सध्या या ई-मेलमधील मजकुराचा तपास सुरु आहे.


‘मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये’; कंगनाला मनसेची तंबी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -