घरदेश-विदेशउत्तर कोरियाचे हुकूमशाह महिन्याभरानंतर अखेर समोर; 9 वर्षांच्या मुलीला करणार उत्तराधिकारी

उत्तर कोरियाचे हुकूमशाह महिन्याभरानंतर अखेर समोर; 9 वर्षांच्या मुलीला करणार उत्तराधिकारी

Subscribe

उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन आपल्या विचित्र निर्णयांमुळे नेहमी चर्चेत असतात. अशात गेल्या महिन्याभरापासून किम जोंग उन गायब झाले होते. त्यामुळे महिन्याभरापासून ते नक्की कुठे आहेत? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नव्हती. यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र महिन्याभरानंतर किम जोंग उन माध्यमांसमोर आले आहेत. यावेळी केवळ किम जोंग उनचं नाही तर त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलीने सर्वांत लक्ष वेधले. यावरून आता किम जोंग आता त्यांच्या 9 वर्षांच्या मुलीला उत्तराधिकारी बनवणार असल्याची चर्चा रंगतेय.

उत्तर कोरियामध्ये अलीकडेच सैन्य दलाचा 75 वा स्थापन दिन पार पडला. यानिमित्ताने परेडमध्ये मोठ्या कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात हुकुमशाह किम जोंग उन दिसले पण त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मुलीवर अनेकांच्या नजरा खिळल्या होत्या. यानंतर महिनाभर किम जोंग उन प्रसारमाध्यांसमोर आले नाहीत. त्यामुळे किम जोंग उन आजारी असल्याच्या चर्चाही रंगल्या. मात्र आता किम जोंग उन आपल्या मुलीसह माध्यमांसमोर आले आहेत.

- Advertisement -

सैन्य दलाच्या स्थापना दिनानिमित्त परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. या संपूर्ण कार्यक्रमात किम जोंग यांच्या शेजारी त्यांची लहान मुलगी देखील पाहायला मिळाली, किम जोंग यांच्या नऊ वर्षांच्या मुलीचं नाव जु-एई असं आहे. जु-एई माध्यमांसमोर सरकारी कार्यक्रमात दिसण्याची ही पाचवी वेळ आहे. मात्र मागील काही काळापासून किम जोंगसोबत जु-एई अनेकदा दिसली. जु-एई किम जोंग यांचं दुसरं अपत्य आहे.

- Advertisement -

स्थापना दिनानिमित्त सैन्य दलाच्या परेडनंतर किम जोंग यांनी भव्य शाही भोजनाचा आस्वाद घेतला. किम यांची ही मुलगी जु-एई सत्ताधारी पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीतही उपस्थित होती. यावेळी सैन्यातील उच्च अधिकाऱ्यांसोबतही चर्चा झाली. सत्तेच्या कामकाजात किम जोंग उन यांची मुलगी जु-एईचा सहभाग वाढतोय. यामुळे किम जोंग त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलीला उत्तराधिकारी घोषित करु शकतात, अशी चर्चा आहे.

किम जोंग यांची मुलगी जु-एई याआधी नोव्हेंबर महिन्यात रॉकेट लाँचच्या वेळी मीडियाच्या समोर आले होते. तेव्हापासून जु-एई किम जोंगची उत्तराधिकारी बनणार असल्याची चर्चा सुरु आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, उत्तर कोरियाचा किम जोंग उन यांची मुलगील जु-एई ही संभाव्य उत्तराधिकारी असेल असं म्हटलं जात आहे. यात पुन्हा या कार्यक्रमातील किम जोंग यांच्या मुलीची उपस्थिती उत्तर कोरियासाठी फार महत्त्वाची असल्याचं म्हटलं जात आहे.


बोनी कपूर यांनी केली श्रीदेवीच्या ‘श्रीदेवी द लीजेंड’ची घोषणा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -