…आणि ‘हुकुमशहा’ प्रेमात पडला! वाचा किम जोंग उन यांची प्रेम कथा

kim jong and wife

उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन त्यांच्या हुकुमशाहिने चांगलेच चर्चेत असतात. किम जोंग उन म्हणजे क्रुर, रागीट इतकच जगाला माहिती असेल. परंतू किम जोंग उन हे प्रेमात पडू शकतात असं कोणाला वाटणार पण नाही. या जगाने आतापर्यंत अनेक हुकुमशहा पाहिले आहेत. त्यांच्या क्रूरतेच्या कहाण्या ऐकल्या आहेत. जर्मनीचा हुकुमशहा हिटलर देखील त्याच्या राजकीय कारकिर्दीइतकाच त्याच्या इव्हा ब्राऊन या प्रेयसीसोबतच्या नात्यामुळे चर्चिला गेला होता. सध्याच्या घडीला किम जोंग उन हुकुमशहा म्हणून ओळखले जातात. किम जोंग उनच्या क्रूरतेच्या कहाण्या तर ऐकणाऱ्याच्या जीवाचा थरकाप उडवतात. एवढ्या क्रुर माणसावर कुणी प्रेम करू शकेल का? त्यांच्यात प्रेम नावाची भावना असेल का? तर या प्रश्नांचं उत्तर आहे हो. किम जोंग उन हे प्रेमात पडले होते.

kim jong

साधारण २००८ दरम्यानची गोष्ट. किम जोंग उन यांनी एका ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाला भेट दिली होती. त्यावेळी ते तत्कालिन हुकुमशहा किम जोंग उल यांचे राजकीय उत्तराधिकारी समजले जात होते. त्या ऑर्केस्ट्रामध्ये गाणाऱ्या एका तरुणीला किम यांनी पाहिलं आणि त्या तरुणीच्या प्रेमात किम पडले. त्या तरुणीचं नाव आहे रि सोल जू. किम जोंग उन यांची लवस्टोरी यासाठी खास आहे कारण, ते एखाद्या राजपुत्रासारखं जीवन जगत होते आणि ती एखाद्या सामान्य मुलीसारखं. किम जोंग उन यांचे वडील आणि आजोबा यांचे अनेक विवाह झाले होते आणि त्याखेरीजही त्यांचे अनेक स्त्रियांशी विवाहबाह्य संबंधही होते. मात्र, किम जोंग उन यांनी एकच विवाह केला आहे. २००९ साली त्यांचं लग्न झालं.


हेही वाचा – Video: ‘मी जिवंत आहे’; डॉक्टरांनी जिवंत रुग्णाला केलं मृत घोषित


रि सोल जू हिचे वडील उत्तर कोरियात प्राध्यापक होते, तर तिची आई डॉक्टर. री सोल जू महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर चीनमध्ये गेली आणि संगीताचं शिक्षण घेतलं. दरम्यान, दक्षिण कोरियात २००५ मधे पार पडलेल्या एशियन एथलेटिक चॅम्पियनशिपसाठी रि सोल यांची चीअरलीडर म्हणून निवड देखील झाली होती. अशा या मध्यमवर्गिय मुलीशी किम जोंग उन यांनी २००९ साली लग्न केलं. वर्षभरात त्यांना मुलगाही झाला. त्यानंतर २०११ साली किम जोंग उन उत्तर कोरियाचचे हुकुमशहा बनले आणि रि सोल जू ही उत्तर कोरियाची फर्स्ट लेडी झाली. त्यांची केमिस्ट्री पाहणारे अनेकजण ते एकमेकांच्या प्रेमात आजही तितकेच आकंठ बुडालेले असल्याचं सांगतात.

सध्या किम जोंग उन त्यांच्या प्रकृतीवरुन चर्चेत आहेत. अनेक माध्यमांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. मात्र, उत्तर कोरियाने यावर मौन बाळगलं आहे.