घरCORONA UPDATEमीडियासमोर आले डुप्लिकेट किम जोंग उन? काय आहे सत्य?

मीडियासमोर आले डुप्लिकेट किम जोंग उन? काय आहे सत्य?

Subscribe

मीडियासमोर आलेले किम जोंग उन खरे नाहीत.

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्याबद्दल एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मीडियासमोर आलेले किम जोंग उन आपली बॉडी दुप्पट करुन आले आहे. डेली मेलच्या एका वृत्तानुसार, किम जोंग उन अचानक बेपत्ता झाले होते. त्यानंतर अनेकांनी त्यांचा मृत्यू झाला असावा असे एक ना अनेक तर्क वितर्क लावले. मात्र, आठ दिवसानंतर आता किम जोंग उन पुन्हा एकदा मीडियासमोर आले आहेत. त्यामुळे हे डुप्लिकेट किम जोंग उन असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

२१ दिवसानंतर आले मीडियासमोर

उत्तर कोरियाचे हुकूमशाह जोंग उन गायब झाल्यानंतर अनेक वावड्या उठल्या होत्या. किम जोंग उन यांची प्रकृती बिघडल्याने उपचार सुरू होते अशाही चर्चा समोर येत होत्या. मात्र, शुक्रवारी तब्बल २१ दिवसांनंतर किम जोंग उन सर्वांसमोर आले. KCNAने दिलेल्या वृत्तानुसार किम जोंग उन यांनी सुनचिओनमध्ये एका कारखान्याच्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावली होती. हे ठिकाण राजधानी प्योंगयांगच्या जवळ आहे. किमची बहीण किम यो जोंग देखील या कार्यक्रमाला उपस्थित होती. तरीही एक प्रश्न अनुत्तरीत राहातोच. किम जोंग यांना नेमके काय झाले होते? २१ दिवस ते कुठे होते आणि त्यासंदर्भात अधिकृत माहिती अद्याप का समोर आली नाही? ११ एप्रिल रोजी जनतेसमोर ते आले होते त्यानंतर ते गायब झाले आणि १ मे रोजी उद्घाटन सोहळ्यात दिसले.

- Advertisement -

इंटरनेटवर किम यांच्या लूकबद्दल खळबळ

किमच्या येण्याने अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही जण म्हणतात की, ‘एवढ्या दिवसानंतर मीडियासमोर येणारा हुकूमशाह हा किम जोंग उन नसून हा डुप्लिकेट किम जोंग आहे. तर काही जणांनी किम जोंग यांचा फोटो आणि आताच्या किंम जोंग यांचा फोटो एकत्र करुन दोन्ही फोटोमधील दात आणि कान या अवयवांमध्ये फरक असल्याचे दाखवून दिले आहे. त्याचप्रमाणे ३६ वर्षापूर्वीची किम जोंग यांचा फोटो आताच्या फोटोत साम्य दिसून येत नाही. त्यामुळे हे खरे किम जोंग नसून डुप्लिकेट किम जोंग उन असल्याचा दावा लोकांनी केला आहे.

हे किम जोंग उन नाहीत

ब्रिटनचे माजी खासदार लुईस मेन्श यांनीही असा दावा केला आहे की, ‘आता मीडियासमोर आलेले किम जोंग नाहीत’. त्यांनी सांगितले आहे की, ‘फोटोमध्ये तुम्ही पाहिलात तर तुम्हालाही फरक दिसून येईल. बारकाईने बघून तुम्हालाही कळेल, की ते खरे किम जोंग नाहीत’.

- Advertisement -

दरम्यान, काही जण म्हणतात की, ‘त्यांच्या शरीरावर एक खूण होती. ती देखील आता किम जोंग यांच्या शरीरावर दिसत नाही. त्यावर डॉक्टरांनी स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, ‘शस्त्रक्रिया करताना त्यांची खूण निघून गेली आहे’. तर अनेक जण म्हणतात की, ‘किम जोंगचे आता गाल देखील वर आलेले दिसत आहेत. तसेच त्यांचे वजन देखील वाढलेले दिसून येत आहे. त्यामुळे हा किम जोंग नसल्याचे स्पष्ट केले आहे’.


हेही वाचा – जास्त मद्यपान करणाऱ्यांना कोरोनाचा अधिक धोका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -