उत्तर कोरियाची एका महिन्यातच तिसऱ्यांदा क्षेपणास्त्र चाचणी, अमेरिकन निर्बंधावर किम जोंगचे जोरदार प्रत्युत्तर

अमेरिकेच्या जो बिडेन प्रशासनाने बुधवारी उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांना प्रतिसाद देत पाच जणांवर निर्बंध लादण्यात आलं होतं. परंतु उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांनी त्यांच्या निर्बंधांची पायमल्ली करत एका महिन्यातच तिसऱ्यांदा क्षेपणास्त्राची चाचणी केली. जर अमेरिकेने संघर्षाचा निर्णय किंवा भूमिका घेतल्यास उत्तर कोरिया अशांत राहणार असल्याचा इशारा कोरियाकडून देण्यात आलाय. दुसरीकडे बिडेन प्रशासनाने म्हणणे आहे की, संयुक्त राष्ट्रांकडून नवीन निर्बंधांची आम्ही मागणी करणार आहोत.

बिडेन प्रशासनाच्या नव्या निर्बंधांचा निषेध

अमेरिकेने निर्बंध उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणी आणि कार्यक्रमांच्या उपकरणांवर लादण्यात आले होते. परंतु क्षेपणास्त्र डागण्याच्या भुमिकेमुळे अमेरिकेकडून हे निर्बंध लादण्यात आले होते. परंतु उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्यांबाबत बिडेन प्रशासनाने घातलेल्या नव्या निर्बंधांचा निषेध केला. उत्तर कोरियाच्या कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याचा हवाला देऊन, हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी संरक्षण सराव म्हणून योग्य ठरवली. तत्पूर्वी मंगळवारी उत्तर कोरियाने सांगितलं की, या चाचणीमुळे युद्धापासून बचाव करण्यासाठी मोठी ताकद मिळेल.

तिसऱ्यांदा उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र चाचणी

दक्षिण कोरिया आणि जापानच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, उत्तर कोरियाने शुक्रवारी कमीत कमी एका बॅलिस्टीक क्षेपणास्त्राची चाचणी करायला हवी. या महिन्यामध्ये तिसऱ्यांदा उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणी केली आहे. अमेरिकेने उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांना प्रतिसाद देत पाच जणांवर निर्बंध लादले होते. त्यासाठी एक करारा जवाब म्हणून उत्तर कोरियाने एका महिन्यात तिसऱ्यांदा क्षेपणास्त्र चाचणी केली आहे.


हेही वाचा : WhatsApp Chatbot : मुंबई महापालिकेची व्हॉट्सअॅप चॅटबॉट सुविधा कशी वापराल ? जाणून घ्या