घरदेश-विदेशKing Charles III : किंग चार्ल्स तृतीय यांना कर्करोगाची लागण

King Charles III : किंग चार्ल्स तृतीय यांना कर्करोगाची लागण

Subscribe

गेल्या वर्षी मे महिन्यात किंग चार्ल्स यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. यानंतर चार्ल्स यांना 'किंग' म्हणून संबोधले गेले.

लंडन : ब्रिटनचे किंग चार्ल्स तृतीय (King Charles III) यांच्या प्रकृतीबाबत बकिंगहॅम पॅलेसकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. किंग चार्ल्स यांना कर्करोगाचे निदान झाले आहे. किंग चार्ल्स यांना कोणत्या प्रकारचा कर्करोग झाला आहे, याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही.

बकिंगहॅम पॅलेसमधून मिळालेल्या माहितीनुसार, किंग चार्ल्स यांना नियमित उपचारादरम्यान कर्करोगाचे निदान झाल्याचे समजले. डॉक्टरांनी किंग चार्ल्स यांना सार्वजनिक कामापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे असून त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले आहे. पण उपचारादरम्यान किंग चार्ल्स हे राजकीय कामे करत राहणार आहेत. किंग चार्ल्स यांना कर्करोग झाल्याच्या माहितीनंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी किंग चार्ल्स लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Rane On Uddhav Thackeray : “भाजपामध्ये येण्यासाठी उद्धव ठाकरेंची धडपड सुरू”, नितेश राणेंचा गौप्यस्फोट

- Advertisement -

किंग चार्ल्सचा अल्पपरिचय

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर किंग चार्ल्स तृतीय हे ब्रिटनच्या गादीवर विराजमान झाले. गेल्या वर्षी मे महिन्यात किंग चार्ल्स यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. यानंतर चार्ल्स यांना ‘किंग’ म्हणून संबोधले गेले. किंग चार्ल्स हे वयाच्या 73 व्या वर्षी किंग झालेत. चार्लस यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी बकिंगहॅम पॅलेसमध्ये झाला. चार्ल्स हे चार वर्षाचे असताना त्यांची आई एलिझाबेथ द्वितीय या ब्रिटनच्या गादीवर विराजमान झाल्या होत्या. 1969 मध्ये 20 वर्षांच्या असताना चार्ल्स यांना राणी एलिझाबेथने प्रिंस ऑफ वेल्स म्हणून नियुक्त केले गेले होते. चार्ल्स यांनी 29 जुलै 1981 मध्ये लेडी डायना स्पेंसर यांच्याशी विवाह केला. या दोघांना दोन मुले प्रिंस विलियम आणि प्रिंस हॅरी आहेत. 28 ऑगस्ट 1996 रोजी चार्ल्स आणि डायना यांचा घटस्फोट झाला. यानंतर 9 एप्रिल 2005 मध्ये चार्ल्स यांनी कॅमिला यांच्यासोबत लग्न केले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -