३१ डिसेंबरपर्यंत आणखी ४० घोटाळे लोकांच्या समोर आणणार, सोमय्यांचा अमरावतीमधून इशारा

kirit somaiya warning 4 leaders corruption exposed in few days and 40 scam till december
३१ डिसेंबरपर्यंत आणखी ४० घोटाळे लोकांच्या समोर आणणार, सोमय्यांचा अमरावतीमधून इशारा

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे वर्षभरात तब्बल १०० घोटाळे समोर आले आहेत. त्यातील ४० घोटाळे ३१ डिसेंबरपर्यंत लोकांसमोर आणणार असल्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. तसेच पुढील काही दिवसांमध्ये ४ मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणणार असल्याचे सोमय्यांनी सांगितले आहे. या चार नेत्यांची नावे त्यांनी सांगितली नाही परंतु वर्णन करुन दोन शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे प्रत्येकी १-१ असल्याचे माहिती दिली आहे. या नेत्यांविरोधातील घोटाळ्याची माहिती आणि फाईल केंद्रीय तपास यंत्रणांना दिली असून लवकरच त्यांची नावे बाहेर काढणार असल्याचा इशारा सोमय्यांनी दिला आहे.

माजी खासदार किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर आहेत. अमरावतीमधील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सोमय्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, ठाकरे सरकारमध्ये गेल्या १२ महिन्यात १०० घोटाळे समोर आले आहेत. त्यातील २४ मोठे घोटाळे आहेत. त्याच्याबाबतची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांना दिली असल्याची माहिती सोमय्यांनी दिली आहे.

दरम्यान सोमय्या यांनी पुढे म्हटलं आहे की, ठाकरे सरकारचे अर्धा डझन नेते जेलमध्ये आणि बेलवर आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत ४० घोटाळे एकंदर लोकांच्या समोर उघडकीस आणणार आहे. आतापर्यंत २८ घोटाळे उघडकीस आणले आहेत. पुढच्या काही दिवसात ठाकरे सरकारचे ४ नेते मंत्री यांच्या तक्रारी वेगवेगळ्या संस्थांना केल्या आहेत. ४ मध्ये २ शिवसेनेचे आहेत त्यातील १ मुख्यमंत्री परिवाराचा महत्त्वाचा सदस्य आहे. दोन्ही सदस्य मुख्यमंत्र्यांच्या मित्र परिवाराचे सदस्य आहे. काँग्रेसचे कॅबिनेट मंत्र्यांचाही समावेश आहे. त्यांचीही यादी आली आहे. आयकर विभाग, ईडी आणि आणखी काही यंत्रणांकडे फाईल पाठवली आहे. चौथे एनसीपीचे सदस्य असल्याचा इशारा सोमय्यांनी दिला आहे.

खोतकर यांचा घोटाळा बाहेर काढणार

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जालना दौऱ्याची घोषणा केली आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचा साखर कारखान्याचा घोटाळा बाहेर आला आहे. आतार एमपीएससीबाबतचा घोटाळा बाहेर काढणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.


हेही वाचा : पवारांच्या सरकारच्या काळातील दंगलीत बाळासाहेबांसोबत आम्हीही रस्त्यावर उतरलो होतो, सोमय्यांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल