घरअर्थजगत९९ रुपयांना विकायचे पँट, आता आहेत ९ हजार कोटींचे मालक

९९ रुपयांना विकायचे पँट, आता आहेत ९ हजार कोटींचे मालक

Subscribe

किशोर बियानी यांना भारतातील आधुनिक रिटेल क्षेत्राचे अग्रणी म्हणून मानले जाते. ९९ रुपयांना पँट विकणारे किशोर बियानी आज ९ हजार कोटींचे मालक आहेत. किशोर बियानी यांनी फ्युचर ग्रुपच्या माध्यमातून रिटेल व्यवसायाचे संपूर्ण साम्राज्य निर्माण केले. किशोर बियानी यांचा जन्म ९ ऑगस्ट १९६१ रोजी मुंबईस्थित कापड व्यापारी घरात झाला. त्यांनी आपल्या कौटुंबिक व्यवसायात खूप रस दाखवला. १९८७ मध्ये किशोर बियानी यांनी कपड्यांचा व्यवसाय रेडिमेड कपड्यांकडे वळवला.

किशोर बियानी यांनी आपल्या ब्रँडचे नाव बदलून पँटालून ठेवले. १९९२ मध्ये, किशोर बियानी यांनी स्टॉक एक्सचेंजमध्ये पँटालून सूचीबद्ध केले. यानंतर, किशोर बियानी यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी रिटेल व्यवसायाची संपूर्ण इकोसिस्टम तयार केली होती. किशोर बियानींनी कपड्यांच्या व्यवसायात एक क्रांतिकारी बदल घडवून आणला. लोक टेलरकडे जाण्याऐवजी रेडीमेड कपडे खरेदी करण्यासाठी रिटेल स्टोअरमध्ये जाऊ लागले.

- Advertisement -

सुरुवातीला, किशोर बियानींना स्टोन वॉश फॅब्रिक व्यवसायात बरेच यश मिळाले, ज्यामुळे त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढला. किशोर बियानी त्यावेळी काहीतरी नवीन करण्याची संधी शोधत होते. किशोर यांना असे काहीतरी करायचे होते ज्याद्वारे देशभरातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी त्यांनी मेंझवेअर प्रायव्हेट लिमिटेड सुरू केली. व्यवसाय सुरू केल्यानंतर किशोर बियानी यांनी वस्त्रोद्योग समजून घेण्यासाठी पाच वर्षे घालवली. मग किशोर बियानी यांनी रेडिमेड कपड्यांचा निर्माता म्हणून व्यवसाय सुरू केला आणि दोन ब्रॅण्ड सुरू केले.

फ्युचर ग्रुपने २००१ मध्ये बिग बाजारचे पहिले स्टोअर उघडले. २००६ पर्यंत ५६ स्टोअर्स झाले आणि २००८ पर्यंत ते ११६ पर्यंत वाढले. २००८ च्या मंदीचा कंपनीवर वाईट परिणाम झाला असला तरी कंपनी वाढतच राहिली. दरवर्षी नवीन दुकाने उघडत राहिली आणि २०१९ पर्यंत एकूण २९५ स्टोअर्स होती. किशोर बियानी यांनी संपूर्ण बाजार भारतीय मध्यमवर्गाला एका छताखाली दिला. बिग बाजार भारताचा वॉलमार्ट म्हणूनही ओळखला जातो.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -