Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश 'किसी को छोडने वाला नहीं...' भाजपाने ट्वीट केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा...

‘किसी को छोडने वाला नहीं…’ भाजपाने ट्वीट केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ

Subscribe

नवी दिल्ली : लोकसभेत विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. गेले दोन दिवस यावर चर्चा झाली असून त्याला आज, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देत आहेत. या चर्चेत विरोधकांनी पंतप्रधान मोदी तसेच त्यांच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या पार्श्वभूमीवर भाजपाने नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात मोदी, ‘किसी को छोडने वाला नहीं…’ असे म्हणताना दिसतात.

हेही वाचा – No-Confidence Motion : एनडीएचे स्थान अधिक बळकट होणार, मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास

- Advertisement -

गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूर राज्यामध्ये हिंसाचार सुरू आहे. मे महिन्यामध्ये कुकी समाजाच्या महिलांना विविस्त्र करून त्यांची मैतेई समाजाकडून धिंड काढण्यात आली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या राज्यात महिलांच्या अत्यांचारांच्या संदर्भातील असंख्य घटना घडल्याचे सांगण्यात येते. त्यापाठोपाठ हरियाणामध्येही हिंसाचाराचा उद्रेक झाला. देशातील एकूण परिस्थितीवरून आसाममधील काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी 26 जुलैला लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. त्यानंतर 8 आणि 9 ऑगस्ट या दोन दिवशी लोकसभेत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. तर आज, गुरुवारी या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार आहेत.

- Advertisement -

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काल, बुधवारी आपल्या भाषणात मोदी सरकारवर जोरदार टीका केली. पंतप्रधानांनी मणिपूरमध्ये माझ्या भारत मातेची हत्या केली, असा गंभीर आरोप त्यांनी केला. पंतप्रधान मणिपूरला देशाचा भागच मानत नाही, त्यामुळे ते आजपर्यंत मणिपूरला गेले नाही, अशी टीका देखील त्यांनी केली. त्यांच्या सर्व आरोपांना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उत्तरे दिली. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी विरोधकांचे सर्व हल्ले परतवून लावले. यावेळी त्यांनी विरोधकांवर प्रतिवार करत त्यांना मोदी सरकारच्या काळातील कामांची पूर्ण यादीच वाचवून दाखवली.

हेही वाचा – Nirmala Sitharaman : “तुम्ही स्वप्नं दाखवत राहिलात, परंतु आम्ही…”; अर्थमंत्र्यांनी विरोधकांवर केला हल्लाबोल

आता विरोधकांनी झाडलेल्या आरोपांच्या फैरीला पंतप्रधान मोदी उत्तर देत आहेत. त्याअनुषंगाने नरेंद्र मोदी यांचा एका अधिवेशनातील व्हिडीओ भाजपाने ट्वीट केला आहे. ‘किसी को छोडने वाला नहीं, आप चिंता मत कीजिए… हर एक का सम्मान करूंगा, आप चिंता मत कीजिए…’ असे ते बोलत असल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळते.

- Advertisment -