Singer KK funeral : हम रहे या ना रहे कल! गायक केके अनंतात विलीन

KK Cremation Live Updates KK Funeral Highlights Singer Cremated, Family Inconsolable, Celebs Bid Emotional Farewell
Singer KK funeral : हम रहे या ना रहे कल! गायक केके अनंतात विलीन

भारताच्या संगीत विश्वातील प्रसिद्ध गायक केके उर्फ कृष्णकुमार कुन्नथ यांच मंगळवारी रात्री ह्रदयविकाराच्या (KK death) झटक्याने निधन झालं. आज त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील वर्सोवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. केके यांच्या मुलाने आणि वडिलांनी त्यांना मुखाग्नी दिला, (kk funeral) यावेळी पाणवलेल्या डोळ्यांनी चाहत्यांनी ‘केके अमर रहे‘ च्या घोषणा देत त्यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी गायक केके यांना अखेरचा निरोप आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी ज्येष्ठ गायक हरिहरन, सलीम मर्चंट, शंकर महादेवन, जावेद अख्तर यांसह बॉलीवूडच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. केकेला अखेरचा निरोप देताना त्याचा मित्र परिवार (kk family) आणि चाहत्यांना अश्रू अनावर झाले होते. (KK Cremation Live Updates)

 

View this post on Instagram

 

A post shared by Social Updates (@telly.worldwide)

केके यांना अखेरची श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईतील पार्क प्लाझा या त्यांच्या निवासस्थानी सकाळपासूनचं चाहत्यांसह लोकांनी मोठी गर्दी केली होती. कोलकत्त्याहून त्यांचे पार्थिव मुंबईत आणलं गेलं. त्यानंतर सकाळी १०:३० ते दुपारी १२:३० पर्यंत त्यांच पार्थिव अंत्यदर्शानासाठी ठेवण्यात आलं होतं. दरम्यान दुपारी 1 वाजता त्यांच्या अंतयात्रेला सुरुवात झाली. शेवटी मुंबईतील वर्सोवा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अखेर ‘हम रहे या ना रहे कल‘ या गाण्याची आठवण देत गायक केके आज अनंतात विलीन झाले आहेत.

Singer KK Death: प्रसिद्ध गायक के के यांचे निधन, संगीत कार्यक्रमादरम्यान हृदयविकाराचा झटका

केके अर्थात कृष्णकुमार कुन्नथ यांचा जीवनप्रवास 

केके याचा जन्म दिल्लीमध्ये जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी झाला होता. दिल्लीतील माउंट मेरी स्कूलमध्ये त्यांनी आपले शालेश शिक्षण पूर्ण केले. यानंतर पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करत केके यांनी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरी केली आणि याचदरम्यान त्याने आपली गायनाची आवडही तितक्याच यशस्वीपणे जोपासली. त्याने 35 हजारांहून अधिक जिंगल्स गायल्या तर 1999 मध्ये ‘ पल’ नावाचा त्याचा पहिला अल्बम रिलीज केला.

या काळात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी केके यांना बॉलिवूडमध्ये गाण्याची पहिली संधी दिली. यावेळी केके यांचं ‘माचीसा’ चित्रपटामधील छोड आये हम… हे त्याचं गाणं तुफान गाजलं. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या हम दिल चुके सनम या चित्रपटामधील ‘तड़प तड़प के…’ या केकेच्या गाण्याने ते प्रसिद्धी झोतात आले, चाहत्यांनीही त्यांना डोक्यावर घेतले. हिंदी चित्रपटांमध्ये केके यांनी 200 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. तर हिंदीसह नऊ भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहे. दरम्यान फिल्मफेयर अवॉर्डसह त्याला अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.


परवानगीशिवाय गाणं प्रदर्शित केल्यास कारवाई करू, सिद्धूच्या कुटुंबियांकडून निर्मात्यांना सूचना