घरदेश-विदेशपंतप्रधान मोदी न थांबता तासन् तास भाषण कसे देतात? मोदींच्या Teleprompter ची...

पंतप्रधान मोदी न थांबता तासन् तास भाषण कसे देतात? मोदींच्या Teleprompter ची अजब गोष्ट

Subscribe

या टेलिप्रॉम्प्टरचे नियंत्रण स्क्रीन पाहणाऱ्या व्यक्तीकडे असते. यामुळे मजुकराचा वेग वाढवायचा किंवा कमी करायचा याचा कंट्रोलही त्या व्यक्तीकडेच असतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस समिटमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी काही तांत्रिक कारणामुळे आपले भाषण मध्येच थांबवले. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पंतप्रधान मोदींच्या टेलिप्रॉम्प्टरमध्ये बिघाड झाल्याने त्यांना भाषण थांबवावे लागल्याचा दावा केला जातोय. यावरून राहुल गांधींनीही भाष्य केलं आहे. त्यामुळे भारतात सध्या मोदींच्या टेलिप्रॉम्प्टरची सर्वाधिक चर्चा सुरु आहे. या टेलिप्रॉम्प्टरच्या मदतीने तुम्ही कोणत्याही विषयावर तासंतास सहज बोलू शकता. जाणून घेऊ मोदींच्या Teleprompter ची अजब गोष्ट…

हे डिव्हाइस जरी सामान्य दिसत असले तरी त्याची किंमत थोडी जास्त आहे. कारण ते जटिल तंत्रज्ञानावर काम करते. या डिव्हाइसचा वापर कॅमेऱ्यासमोर टेक्स वाचण्यासाठी केला जातो. त्यामुळे लाईव्ह पाहणाऱ्या लोकांना याची भनक सुद्धा लागत नाही की तुम्ही हे टेक्स वाचून बोलताय.

- Advertisement -

या डिव्हाइसचा वापर सर्वाधिक मीडिया इंडस्ट्रीत केला जातो. टीव्ही अँकरपासून ते चित्रपट अभिनेत्यांपर्यंत ते त्यांचे संवाद किंवा त्यांची कथा वाचण्यासाठी या डिव्हाइसचा वापर करतात. आता या डिव्हाइसने राजकारणही ढवळून निघाले आहे. राजकारणी या डिव्हाइसचा वापर सभेत भाषणं करण्यासाठी करतात त्यामुळे त्याची मागणी खूप वाढली आहे. हे डिव्हाइस पारदर्शक काचेसारखे असते. हे समोरच्या व्यक्तीला काचेसारखे वाटते. परंतु स्टेजवर असलेल्या व्यक्तीला सर्वकाही स्पष्टपणे दिसते.

या टेलिप्रॉम्प्टरचे नियंत्रण स्क्रीन पाहणाऱ्या व्यक्तीकडे असते. यामुळे मजुकराचा वेग वाढवायचा किंवा कमी करायचा याचा कंट्रोलही त्या व्यक्तीकडेच असतो. मात्र पंतप्रधान आणि राजकीय नेते वापरत असलेले टेलिप्रॉम्प्टर थोड्या वेगळ्या पद्धतीचे आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींचे लाल किल्ल्यावरील भाषण व्यवस्थित पाहिले असेल तर तुम्ही पंतप्रधानांच्या आजूबाजूला एक ग्लास पॅनल दिसले. काही जण याला बुलेट प्रूफ ग्लास असल्याचे म्हणतात, पण प्रत्यक्षात ते टेलिप्रॉम्प्टर डिव्हाइस असते.

या टेलीप्रॉम्पटरला Conference Teleprompter म्हटले जाते. यात LCD मॉनिटर खालील बाजूस असून ज्याचा फोकस वरच्या बाजूस असतो. भाषण देणाऱ्या व्यक्तीच्या आसपास ग्लास लागलेले असतात. ज्यावर LCD मॉनिटरवरील टेस्क्ट रिफ्लेक्ट होतात. पंतप्रधान मोदी याच टेलीप्रॉम्पटरच्या मदतीने कुठल्याही अडथळ्याशिवाय भाषण वाचून पूर्ण करतात.

यावेळी पंतप्रधानांच्या भाषणाचा वेग ऑपरेटरकडून कंट्रोल केला जातो. ऑपरेटर भाषण अत्यंत काळजीपूर्वक ऐकत असतो. ज्यावेळी ते थांबतात त्यावेळी ऑपरेटर मजकूर थांबवतो. मात्र प्रेक्षकांना हे टेस्क्ट दिसत नाही. त्यांना केवळ ग्लास आणि त्यामागे उभा असलेला व्यक्ती दिसतो. या प्रकारच्या टेलिप्रॉम्प्टरची किंमत भारतात सुमारे 2,78,755 ते 17,12,485 रुपयांपर्यंत आहे, मात्र ही किंमत साइज आणि पेयरवर अवलंबून असते.


‘तोच पंजाबचा खरा मुख्यमंत्री असेल…’ निवडणुकीपूर्वी सोनू सूदचा नवा व्हिडीओ व्हायरल


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -