घरदेश-विदेशकाय आहे मिराज - २०००

काय आहे मिराज – २०००

Subscribe

भारताने ८० च्या दशकात फ्रान्सकडून मिराज- २००० विमान खरेदी केले होते. दोन इंजिन इसलेल्या या विमानाची निर्मिती दसो कंपनीनेच आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा बदला घ्या अशा संतप्त प्रतिक्रिया देशभरातील जनतेकडून येत होत्या. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा दहशतवादी हल्ला केला होता. मात्र वारंवार दहशतवादी हल्ले करुन देखील पाकिस्तान हात वर करत राहिले. आज पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने घेतला. भआरताच्या मिराज- २००० या लढाऊ विमानाने पाकिस्तानमध्ये घूसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उध्वस्त केले. भारताने पाकिस्तानवर दुसऱ्यांदा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. आज पहाटे साडेतीन वाजता भारताच्या मिराज – २००० द्वारे दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे २०० ते ३०० दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

एकाचवेळी दोन ठिकाणी करु शकतो हल्ला

आज केलेल्या एअर स्ट्राईकच्या कारवाईमध्ये भारताने मिराज – २००० या लढाऊ विमानाचा वापर केला. हे विमान इस्त्रायली तंत्रज्ञानाने सज्ज लेझर गाईडेड मासाईल या मिराज २००० मध्ये आहेत. भारताने ८० च्या दशकात फ्रान्सकडून मिराज- २००० विमान खरेदी केले होते. दोन इंजिन इसलेल्या या विमानाची निर्मिती दसो कंपनीनेच आहे. दसो कंपनीकडून भारत आता राफेल लढाऊ विमान खरेदी करत आहे. चार वर्षापूर्वी मिराज अपग्रेडेड करण्यात आले होते. त्यानंतर या विमानाची लढाऊ क्षमता वाढली आहे. जमिनीवर असणाऱ्यांवर हल्ला करण्यासोबतच हे लढाऊ विमान शत्रूंच्या दोन विमानाना एकाचवेळी प्रत्युत्तर देऊ शकते. त्याचसोबत हे विमान जमिनीवर एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करु शकते.

- Advertisement -

मिराज पूर्णपणे स्वयंचलित

दुहेरी इंजिन असले तरी, हे विमान विद्युत् वायूमार्गाच्या दिशेने शत्रूच्या विमानावर हल्ला करू शकतो. विमानाची स्पेक्ट्रा सिस्टम सक्षम पध्दतीने काम करते. हे विमान पूर्णपणे स्वयंचलित आहे म्हणजेच हे विमान स्वत:हून काम करते. स्पेक्ट्रा सिस्टमला दसो कंपनीनेच तयार केले आहे. यामध्ये पूर्णपणे स्वयंचलित इलेक्ट्रॉनिक सुरक्षा व्यवस्था आहे. हे विमान एकाचवेळी दोन शत्रूंना लक्ष्य करु शकते.

मिराजमधून ऐवढा शस्त्रसाठी नेऊ शकतो

मिराज २००० या लढाऊ विमानाचा जास्तीत जास्त वेग २३०० किलोमीटर प्रति तास आहे. या विमानाचे वजन ७,५०० किलोग्राम आहे. ज्यावेळी या विमानात शस्त्रसाठा ठेवला जातो त्यावेळी त्याचे वजन १३,८०० किलोग्राम होते. म्हणजेच हे विमानात सहा हजार किलोग्रामचे बॉम्ब आणि क्षेपणास्त्रासोबत हल्ला करण्यात सक्षम आहे. तसंच ३० एमएमचे रॉकेट, काही प्रकारची क्षेपणास्त्र आणि लेजर गाइडेड बॉम्बला एकत्र आणू शकतो. भारताकडे ५१ मिराज विमान आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -