अमर जवान ज्योतीचे १९७१ युद्धाशी कनेक्शन काय? कुठे स्थलांतरित करणार मशाल? जाणून घ्या

आता ही ज्योत नॅशनल मेमोरियलमध्ये विलीन करण्यात येणार आहे. नॅशनल वॉर मेमोरियल इंडिया गेटपासून ४०० मीटरच्या अंतरावर आहे. तिकडेसुद्धा एक ज्योत जळत आहे. हे मेमोरियल ४० एकरावर बनवण्यात आले आहे. मेमोरियलच्या भींतींवर शहीदांचे नाव कोरण्यात आली आहेत.

know history about amar jawan jyoti and india gate 1971 war
अमर जवान ज्योतीचे १९७१ युद्धाशी कनेक्शन काय? कुठे स्थलांतरित करणार मशाल? जाणून घ्या

इंडिया गेटजवळ असलेली अमर जवान ज्योत आता स्थलांतरित करण्यात येणार आहे. या ज्योतच्या जागी नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. अमर जवान ज्योतची मशाल आता नॅशनल वॉर मेमोरियलमध्ये पाहायला मिळणार आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचा आरोप होता की, ५ दशकांपासून जळत असणारी अमर जवान ज्योत विझवण्यात येत आहे. परंतु केंद्र सरकारकडून आता स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ज्योत विझवण्यात येणार नाही तर नॅशनल वॉर मेमोरियलमध्ये विलीन करण्यात येणार आहे.

अमर जवान ज्योतच्या इतिहासाबाबत तुम्हाला माहिती नसेल तर पूर्ण माहिती जाणून घ्या. परंतु या पूर्वी तुम्हाला इंडिया गेटचा इतिहाससुद्धा माहिती करुन घेतला पाहिजे. इंडिया गेटचे बांधकाम इंग्रजांच्या काळात करण्यात आले आहे. ब्रिटीश सरकारने १९१४ ते १९२१ दरम्यान प्राण गमावणाऱ्या ब्रिटीश भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ इंडिया गेटची निर्मिती केली आहे. १९१४ ते १९१८ दरम्यान पहिल्या विश्व युद्धामध्ये आणि १९१९ मध्ये तिसऱ्या एंग्लो अफगान युद्धात ८० हजारपेक्षा अधिक भारतीय सैनिक शहीद झाले आहेत. या सैनिकांना श्रद्धांजली देण्यासाठी इंडिया गेट बनवण्यात आला आहे.

इंडिया गेटचे डिझायन एडविन लुटियनने केले आहे. बांधकामाचे शिलान्यास १० फेब्रुवारी १९२१ रोजी करण्यात आले होते. तसेच १० वर्षात इंडिया गेटचे बांधकाम पूर्ण केले होते. तसेच १२ फेब्रुवारी १९३१ मध्ये तत्कालीन वायसराय लॉर्ड इर्विन यांनी इंडिया गेटचे उद्घाटन केले होते.

अमर जवान ज्योतचा इतिहास काय?

भारत आणि पाकिस्तानमध्ये १९७१ मध्ये युद्ध झाले होते. हे युद्ध ३ ते १६ डिसेंबर पर्यंत सुरु होते आणि पाकिस्तानला भारतासमोर शरण यावे लागले होते. यामध्ये भारतीय जवानसुद्धा शहीद झाले होते. १९७१ च्या युद्धात भारतीय सैन्यातील ३ हजार ८४३ जवान शहीद झाले होते. याच जवानांच्या आठवणीत अमर ज्योत जळत ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर इंडिया गेटमध्ये एक काळ्या रंगाचे स्मारकाची निर्मिती करण्यात आली. ज्या स्मारकावर अमर जवान लिहिण्यात आले. तसेच त्यावर एक L1A1 सेल्फ लोडिंग राइफल ठेवण्यात आली आहे. या राइफलवर एक हेल्मेट लावण्यात आले आहे.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या स्मारकाचे २६ फेब्रुवारी १९७२ साली उद्घाटन करण्यात आले आहे. स्मारकात एक ज्योत जळवण्यात आली आहे. २००६ पासून ही ज्योत जळत ठेवण्यासाठी एलपीजीचा वापर करण्यात येत आहे. परंतु काही वर्षानंतर सीएनजीचा वापर करण्यात येत आहे.

आता ही ज्योत नॅशनल मेमोरियलमध्ये विलीन करण्यात येणार आहे. नॅशनल वॉर मेमोरियल इंडिया गेटपासून ४०० मीटरच्या अंतरावर आहे. तिकडेसुद्धा एक ज्योत जळत आहे. हे मेमोरियल ४० एकरावर बनवण्यात आले आहे. मेमोरियलच्या भींतींवर शहीदांचे नाव कोरण्यात आली आहेत.

इंडिया गेटवर नेताजी सुभाष चंद्र बोस यांची होलोग्राम प्रतिमा

अमर जवान ज्योतचे स्थलांतर करुन त्या ठिकाणी इंडिया गेट वर नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. पुतळ्याचे काम सुरु असेपर्यंत त्या ठिकाणी नेताजी सुभाष चंद्र बोस यांची होलोग्राम प्रतिमा लावण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा पुतळा २८ फूट उंच आणि ६ फूट रुंद असेल.


हेही वाचा : India Gateवर आता उभारला जाणार सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा; वादानंतर PM Modiची घोषणा