घरदेश-विदेशस्वस्त दरात वस्तूंची विक्री करणारा श्रीमंत मालक; वाचा D-Mart च्या यशाची कहाणी

स्वस्त दरात वस्तूंची विक्री करणारा श्रीमंत मालक; वाचा D-Mart च्या यशाची कहाणी

Subscribe

अनेक वस्तू एकाच छताखाली आणि MRP पेक्षा जास्त जर कमी किमतीत मिळाल्या तर? वेळ, शक्ती आणि पैसा या तीनही गोष्टींची बचत होईल. याच संकल्पनेतून 2002 मध्ये डी- मार्ट सुरु करण्यात आले.

कुठल्याही सणासुदीला, समारंभाला किंवा महत्त्वाच्या प्रसंगी आपल्याला पूर्व तयारी करावी लागते. या तयारीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरेदी. यावेळी आपल्याला गोष्टी खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या दुकानात जावे लागते. त्यामुळे खूप वेळ जातो आणि त्यामानाने खर्चही जास्त होतो. ( Know the Story of D-Mart success who is Radhakishan Damani know in Detail )

पण, अनेक वस्तू एकाच छताखाली आणि MRP पेक्षा जास्त जर कमी किमतीत मिळाल्या तर? वेळ, शक्ती आणि पैसा या तीनही गोष्टींची बचत होईल. याच संकल्पनेतून 2002 मध्ये डी- मार्ट सुरु करण्यात आले.

- Advertisement -

स्वस्तात किराणा विकणारे श्रीमंत मालक

शेअर बाजाराने अनेकांना रातोरात श्रीमंत केले आहे. तर काहींना रसातळालाही नेले आहे. बरेच लोक शेअर बाजारातील तज्ज्ञ राकेश झुनझुनवाला यांना आपला आदर्श मानतात. तसेच, अनेक जण राकेश झुनझुनवालांकडून गुंतवणुकीच्या टिप्सही घेतात. पण राकेश झुनझुनवाला हे स्वत: राधाकिशन  दमानी यांच्याकडून गुंतवणुकीच्या टिप्स शिकलेत. डीमार्टचं साम्राज्य हे राधाकिशन दमानींनी उभे केले आहे.

कोण आहेत राधाकिशन दमानी?

1954 मध्ये बिकानेर राजस्थान येथे जन्मलेले राधाकृष्ण दमानी डी-मार्टचे संस्थापक आहेत. बिझनेस लीडर आणि स्टाॅक एक्सपर्ट म्हणून ओळखले जाणारे राधाकिशन दमानी यांनी प्रत्यक्षात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेलं नाही. तसेच, इतके मोठे उद्योगपती असूनही त्यांच एकाही सोशल मीडियावर अकाऊंट नाही.

- Advertisement -

( हेही वाचा: मी माणूस आहे, मीही आजारी पडतो; नॉट रिचेबलच्या चर्चांवरुन अजित पवार संतापले )

राधाकिशन यांचा दररोजचा निव्वळ नफा हा तब्बल 4 कोटी आहे. 80 आणि 90 च्या दशकात शेअर बाजारात एक प्रसिद्ध गुंतवणूकदार म्हणून ठसा उमटवणारे राधाकिशन दमानी यांनी 2002 मध्ये डी मार्ट सुरु केले. डी- मार्टचे मालक राधाकिशन दमानी फोर्ब्जच्या 2023 च्या सर्वांत श्रीमंत भारतीयांच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत. कोट्यावधींचा नफा डी-मार्टच्या माध्यमातून राधाकिशन दमानी यांनी 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये 1492 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. हा नफा दैनंदिन आधारावर मोजला तर ही रक्कम प्रतिदिन 4 कोटी रुपये होते. या काळात डी मार्टमध्ये 30 हजार 976 हजार कोटी रुपयांची विक्री झाली होती. कंपनीचे मार्केट कॅप 2 लाख 26 हजार 640 कोटी रुपये आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात टायटन या टाटा समूहाच्या कंपनीच्या उत्पादनींची विक्री 28 लाख 799 कोटी रुपये होती. म्हणजेच राधाकिशन दमानी यांच्या डी-मार्टने विक्रीच्या बाबतीत टायटनला मागे टाकले. टायटनचा नफा 2 हजार 1968 कोटींचा होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -