Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Chandrayaan 3 बद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का? रांचीत लाँचिंग पॅड तर...

Chandrayaan 3 बद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का? रांचीत लाँचिंग पॅड तर…

Subscribe

Chandrayaan-3 : भारत (India) अवघ्या काही तासांवर इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी भारताचे चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष भारतावर असणार आहे. इस्रोच्या (ISRO) चांद्रयान-3 मोहिमेच्या यशामागे देशभरातील प्रतिभावंतांची मेहनत आहे. देशातील विविध शहरांशी संबंधित शास्त्रज्ञांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर चांद्रयान-3 मिशनला अत्याधुनिक बनवले आहे. कोणी कॅमेरा तर, कोणी खास सॉफ्टवेअर बनवले आहे. त्यामुळे चांद्रयान-3 आपल्या लक्ष्याकडे योग्य दिशेने वाटचाल करत आहे. आज आपण कोणत्या शहरातील शास्त्रज्ञांनी कोणते भाग तयार केले, याबद्दल जाणून घेऊया… (Know these things about Chandrayaan 3 The launching pad in Ranchi is)

फतेहपूरमध्ये तयार झाला कॅमेरा

चांद्रयान-3 च्या लँडर आणि रोव्हरमध्ये बसवण्यात आलेले अत्याधुनिक कॅमेरे फतेहपूरचे अंतराळ शास्त्रज्ञ सुमितकुमार आणि त्यांच्या टीमने डिझाइन केले आहे. सुमितकुमार 2008 पासून इस्रोच्या अहमदाबाद केंद्रात काम करत आहेत. सुमितकुमार आणि त्याच्या टीमने चांद्रयान-3 च्या लँडर आणि रोव्हरमध्ये बसवलेले पाच कॅमेरे अत्याधुनिक पद्धतीने डिझाइन तयार करण्यात आले आहेत. पेलोडमध्ये बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांनी लँडर आणि रोव्हरला चंद्रावर त्यांचे स्थान आणि दिशा दाखविण्यास मदत केली आहे. रोव्हर चंद्राच्या मातीचे मूल्यांकन करणार असून लँडरला डेटा पाठणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Chandrayaan-3 : चंद्रावर तिरंगा फडकवण्यासाठी भारत सज्ज; शेवटची 15 मिनिटे महत्त्वाची

उन्नावमध्ये चांद्रयान-3च्या लँडिंग सिस्टमवर काम

चांद्रयान-3चे प्रक्षेपण करण्यापासून ते लँडर प्रोपल्शन प्रणालीच्या विकासापर्यंत युवा अंतराळ शास्त्रज्ञ आशिष मिश्रा यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. चांद्रयान-3 च्या लँडिंगसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कंट्रोल इलेक्ट्रॉनिक्स आणि थ्रॉटलिंग व्हॉल्व्हच्या विकासामध्ये आशिष मिश्रा यांनी विशेष योगदान दिले आहे. 14 वर्षांचा अनुभव असलेल्या आशिष मिश्रा यांनी 2008 पासून इस्रोमध्ये काम करण्यास सुरूवात केली. त्यांनी आतापर्यंत PSLV, GSLV आणि LVM-3 मध्ये देखील योगदान दिले आहे.

मिर्झापूरमध्ये तयार झाले लँडिंग आणि कंट्रोलिंग सिस्टम

- Advertisement -

मिर्झापूरचे लाल आलोक पांडे यांनी चांद्रयान-3 च्या लँडिंग आणि कंट्रोलिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मंगळयान मिशन-2 मध्ये केलेल्या चांगल्या कामासाठी इस्रोने लाल आलोक पांडे यांना उत्कृष्ट वैज्ञानिक पुरस्कार दिला आहे. यानंतर त्यांच्यावर चांद्रयान-3 च्या लँडिंग आणि कम्युनिकेशनची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

हेही वाचा – Chandrayaan-3 : चंद्राच्या पृष्ठभागावर दोन मीटर प्रती सेकंद या वेगाने लँडिंग करू शकते?

चांद्रयान-3 मोहिमेत मुरादाबादचे तीन शास्त्रज्ञ

चांद्रयान-3 मोहीमेतील आतापर्यंतच्या यशामागे मुरादाबाद शहरातील मेघ भटनागर, अनिश रमण सक्सेना आणि रजत प्रताप सिंग या तीन शास्त्रज्ञांचा महत्त्वाचा वाटा आहे. मेघ भटनागर हे इस्रोच्या बेंगळुरू येथे कार्यरत असून चांद्रयान-3 चा मेंदू मानल्या जाणार्‍या ऑनबोर्ड सॉफ्टवेअरचे गुणवत्ता नियंत्रण त्यांनी हाताळले आहे. त्यामुळे चांद्रयान-3 योग्य मार्ग शोधून आपल्या लक्ष्याकडे वाटचाल करत आहे. चांद्रयान-3ला पृथ्वीच्या कक्षेत नेणाऱ्या रॉकेटचे नियंत्रण रजत प्रताप सिंग यांनी केले आहे तर, अनिश रमण सक्सेना हे मिशन चांद्रयान-1 पासून या मोहिमेत सतत सक्रिय योगदान देत आहेत. सध्या ते अहमदाबादयेथील इस्रोमध्ये काम करतात. अनिश यांनी त्यांच्या टीमसह चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरसाठी प्रोब तयार केले होते. यानंतर त्यांनी चांद्रयान-3 चे काम सुरू असतानाही आपले योगदान दिले आहे.

रांचीमध्ये लॉन्चिंग पॅडसह अनेक उपकरणांची निर्मिती

रांचीच्या हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशनने (HEC) अनेक महत्त्वाची उपकरणे तयार केली आहेत. यात क्षैतिज सरकता दरवाजा, फोल्डिंग प्लॅटफॉर्म आणि विल बोगी सिस्टीम यांचा समावेश आहे. ही सर्व उपकरणे असेंबलिंग एरियापासून लॉन्चिंग पॅडपर्यंत वापरली जातात. एचईसीने इस्रोच्या सर्व प्रकल्पांची अनेक कामे पूर्ण केली आहेत. चांद्रयानसह सर्व उपग्रह अवकाशात पाठवले जाणारे प्रक्षेपण पॅड एचईसीने तयार केले आहे. दरवर्षी एचईसीला इस्रोच्या एका किंवा दुसर्‍या प्रकल्पासाठी काम मिळते. एचईसीने गगनयानसाठी देखील लॉन्चिंग पॅड बनवत आहे.

हेही वाचा – Sugar : देशात साखरेची कमतरता नाही, भारतात 330 लाख मेट्रीक टन उत्पादनाचा अंदाज

प्रयागराजमध्ये चंद्रावरील धोके शोधण्याची यंत्रणा तयार केली

शास्त्रज्ञ हरिशंकर गुप्ता यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 चे सुरक्षित लँडिंग करण्यासाठी धोका शोधण्याची यंत्रणा तयार केली आहे. या यंत्रणेसह चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना, लँडरला खड्ड्याचा धोका जाणवेल आणि सुरक्षित पृष्ठभाग मिळाल्यानंतर ते आपोआप उतरेल. लँडरमध्ये इंटेलिजन्स सेन्सर्सचा वापर करण्यात आला आहे. हरिशंकर गुप्ता चांद्रयान-1 आणि चांद्रयान-2 मध्येही सहभागी झाले होते. हरिशंकर गुप्ता यांनी 2017 मध्ये MNNIT मधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन शाखेत एमटेक केले आहे. यानंतर ते 2017 पासून बेंगळुरू येथे इस्रो शास्त्रज्ञ म्हणून नियुक्त झाले.

प्रतापगडमध्ये चांद्रयान-3 मध्ये बसवण्यात आले ‘शेप’

प्रतापगडचे रवी केसरवानी आणि त्यांच्या टीमने चांद्रयान-3 मध्ये ‘शेप’ लावण्याचे काम केले आहे. रवी यांच्या मते, आतापर्यंत लँडरला चंद्रावरून परावर्तित प्रकाश मिळतो आहे. त्यानुसार लँडर ‘आकार’ घेऊन थेट ‘पृथ्वी’शी जोडून प्रकाश घेत आहे. चांद्रयान-2 मध्ये ही व्यवस्था नव्हती, त्यामुळे चांद्रयान-2 चंद्रावर उतरू शकले नव्हते. पण त्यानंतर जेव्हा चांद्रयान-3ची तयारी सुरूझाली तेव्हा कोणतीही नवीन उपकरणे जोडता येतील अशा सूचना बैठकीत सर्व शास्त्रज्ञांकडून मागवण्यात आल्या होत्या. तेव्हा रवी यांच्या टीमने चांद्रयान-3 मध्ये ‘शेप’ सुचवला होता.

- Advertisment -