Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी बैठक सुरु असताना केजरीवालांनी का मागितली मोदींची माफी, जाणून घ्या

बैठक सुरु असताना केजरीवालांनी का मागितली मोदींची माफी, जाणून घ्या

लाईव्ह स्ट्रीममध्ये काय म्हणाले केजरीवाल

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना प्रादुर्भावाचा उद्रेक झाला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्यामुळे देशात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. देशातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १० कोरोनाप्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक आज घेतली. या बैठकीत सर्व राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. ही बैठकी व्हीसीद्वारे घेण्यात आली होती. बैठकीदरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संबोधनास सुरुवात केली तेव्हा त्यांनी भाषणाचे लाईव्ह प्रक्षेपण केले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टोकल्यावर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागीतली आहे.

काय आहे प्रकरण

देशातील कोरोना स्थितीचा आढावा बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली. या बैठकीला १० राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांना बोलण्यास सांगितले तेव्हा त्यांनी बैठकीचे लाईव्ह प्रक्षेपण केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केजरीवाल यांनी लाईव्ह प्रक्षेपण केल्यामुळे हटकले यानंतर केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींची माफी मागतली. यावेळी केजरीवाल यांनी म्हटले की, ठिक आहे सर, यापुढे काळजी घेतली जाईल, जर माझ्याकडून काही चूक झाली असेल, तसेच मी काही कठोर बोललो असेल, माझ्या आचरणात काही अयोग्य घडले असेल तर त्यासाठी मी माफी मागतो अशा शब्दात केजरीवाल यांनी अशा शब्दात पंतप्रधान मोदींची माफी मागिती आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी

- Advertisement -

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केलेल्या लाईव्ह प्रक्षेपणावर मोदींनी आक्षेप घेतला यावेळी मोदींनी म्हटले की, एखाद्या मुख्यमंत्र्यांनं अंतर्गत बैठकीचं लाईव्ह प्रक्षेपण करणं हे आपली परंपरा, आपले प्रोटोकॉल यांच्याविरोधात आहे. तसेच हे योग्य नाही. त्यामुळे आपल्याला याचे पालन करायला हवे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांना म्हटले. यानंतर केजरीवाल यांनी मोदींची माफी मागितली.

लाईव्ह स्ट्रीममध्ये काय म्हणाले केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांनी लाईव्ह स्ट्रीम दरम्यान कोरोनाच्या नियंत्रणाच्या नॅशनल प्लॅनवर भाष्य केलं याशिवाय ऑक्सिजन तुटवडा आणि टॅंकर अडवले जाण्याच्या प्रश्नावर आपले मत मांडले होते. तसेच यावर मोदींकडून दिलासा मिळण्याची आपेक्षा केली होती.

- Advertisement -