कोणत्याही ट्रायलविना भारतात Moderna Vacccine ला कशी मिळाली मंजुरी? ‘हे’ आहे कारण

Moderna Granted Emergency Use Approval For Import Of COVID-19 Vaccine By DCGI
Moderna Vaccine : अमेरिकेच्या मॉडर्ना लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी

कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी भारतात आता अमेरिकच्या मॉडर्ना कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी आता डीसीजीआयने मान्यता दिली आहे. त्यामुळे भारतात आता कोव्हिशील्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिक-V या लसीनंतर आता मॉडर्ना ही चौथी लस उपलब्ध झाली आहे. मुंबई येथील फार्मा कंपनी सिप्लाने मॉडर्ना लसीच्या आयात आणि मार्केट अथॉराइजेशन मंजुरी मागितली होती. ज्याला डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. परंतु अनेकांच्या मनात असा प्रश्न पडला आहे की, भारतात मॉर्डना लसीवर कोणतेही ट्रायल झाले नसतानाही या लसीला वापरासाठी मान्यता कशी मिळाली? यामागे नेमके काय कारण आहे जाणून घेऊ या…

Moderna लसीवर भारतात का नाही झाल्या ट्रायल ?

वास्तविक, अमेरिकच्या मॉडर्ना कोरोना लसीचा समावेश हा जागतिक आरोग्य संघटनेच्या लसींच्या यादीमध्ये झाला आहे. याच कारणामुळे मॉडर्ना लसीवर भारतात ब्रिजिंग चाचण्या झाल्या नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेच्या लसींच्या यादीत समाविष्ठ झालेल्या लसींवर WHO सह अनेक संशोधनकर्त्यांकडून चाचण्या केल्या. त्यामुळे WHO मान्यता प्राप्त लसींचा वापर कोणताही देश करु शकते. या मान्यता प्राप्त लसींबाबतची अधिक माहिती WHO कडे असते.

किती तापमानात ही लस राहिल सुरक्षित ?

२५ ते ५० डिग्री तापमानात मॉर्डना ही लस सात महिन्यांपर्यंत सुरक्षित राहू शकते. सर्वसाधारणपणे मॉर्डना लशीसाठी २० डिग्री सेल्सिअस तापमान आवश्यक आहे. जर या लसीची कुपी खुली नसेल तर ती दोन ते आठ डिग्री तापमानात ३० दिवस ठेवता येते. परंतु या लसीच्या पहिल्या डोसनंतर चार आठवड्यानंतर दुसरा डोस घेणे आवश्यक आहे.

पुढील महिन्यात दाखल होईल Moderna ची पहिली खेप ?

पुढील महिन्यात Moderna लसीची पहिली खेप भारतात दाखल होईल. यानंतर कसौली येथील केंद्रीय प्रयोगशाळेत पहिल्या तुकडीची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर १०० लोकांच्या लसीकरणानंतर त्यांचा अभ्यास केला जाईल. त्यानंतरचं ही लस रुग्णालयांमध्ये उपलब्ध होईल. यास किमान १ महिना लागू शकतो.

भारतात कोणत्या लसींना आजपर्यंत मिळाली मान्यता?

१) पहिली लस – सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्हिशील्ड लसीला जानेवारी २०२१ मध्ये आपत्कालीन वापरासाठी प्रथम मंजुरी मिळाली.

२) दुसरी लस- कोव्हिशील्डनंतर भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीलाही जानेवारी २०१ मध्ये आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली.

३) तिसरा लस- स्पुतनिक-V या लसीला एप्रिल २०२१ मध्ये आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळाली.

४) चौथी लस-मॉर्डना या लसीला जून २०२१ मध्ये आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळाली.


कोरोना रुग्णांकडून जादा बिल उकळणे भोवले, नागपूरातील ५८० रुग्णालयांविरोधात तक्रार दाखल