Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश ... तर उत्तर कोरियातील नागरिकांना होणार थेट मृत्यूदंड! हुकूमशहा किम जोंग उनचा...

… तर उत्तर कोरियातील नागरिकांना होणार थेट मृत्यूदंड! हुकूमशहा किम जोंग उनचा अजब फतवा

Related Story

- Advertisement -

उत्‍तर कोरियाचा सनकी हुकूमशहा किम जोंग उन हे नेहमी त्यांच्या अनोख्या कायद्यांमुळे चर्चेत असतात. उत्तर कोरियातील अजब नियम, कायद्यांची चर्चा नेहमीच होत असते. उत्तर कोरियामध्ये सध्या एका अजब विधेयक सादर करण्यात आले आहे. या कायद्यानुसार, उत्तर कोरियात परदेशी प्रभाव संपवण्यासाठी परदेशी चित्रपट, कपडे आणि असंसदीय शब्दांचा वापर करण्यास मनाई असणार आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारावासापासून ते मृत्यूदंडाची शिक्षा कोरियातील नागरिकांना करण्यात येणार आहे. यापूर्वी, किम जोंग उनने एका व्यक्तीला, तो केवळ दक्षिण कोरियन चित्रपटासह पकडला गेला म्हणून मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती.

कोरियन सैनिकांच्या अधिकाऱ्यांकडून असे सांगण्यात आले की, ज्यावेळी फक्त ११ वर्षांची यून मिन होती. त्यावेळी या उत्तर कोरियन व्यक्तीला मृत्यूची शिक्षा देण्यात आली. त्याच्या शेजारच्या व्यक्तींना मृत्यूची प्रक्रिया पूर्ण बघण्याचा आदेश देण्यात आला होता. तुम्ही ती पाहिली नाही तर त्याला राजद्रोह समजले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. अश्लील व्हिडिओची तस्करी करणाऱ्या व्यक्तींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे.

असे लिहिले किम जोंग यांनी पत्र

- Advertisement -

आता किम जोंग उन प्रशासनाने ‘प्रतिक्रियात्मक’ विचारांविरूद्ध नवा कायदा तयार केला आहे. जर, दक्षिण कोरिया, अमेरिका अथवा जपानच्या मिडिया सामग्रीसह कुणी आढळून आले, तर त्याला फाशीची शिक्षा दिली जाईल. एवढेच नाही, तर हे पाहतांना जे कुणी पकडले जाईल त्याला १५ वर्षांचा कारावास होऊ शकतो. तसेच, देशातील यूथ लीगने तरुणांतील समाजवादविरोधी विचारसरणीविरोधात अॅक्‍शन घ्यावी, असेही किम याने नुकतेच एक पत्र लिहून म्हटले होते.तरुणांमध्ये परदेशी भाषणे, हेअर स्‍टाइल आणि कपड्यांचा प्रसार रोखण्याची किमची इच्छा आहे. हे घातक विष असल्याचे त्याने म्हटले आहे.

उत्तर कोरियाच्या प्रशासनाकडून देशातील युवकांमध्ये परदेशी भाषण, केशरचना आणि कपड्यांचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दक्षिण कोरियाच्या ‘डेली एनके’ने दिलेल्या वृत्तानुसार, कोरियन पॉपस्टार्स सारखी केशरचना केल्यामुळे अनेक किशोरवयीन मुलांना पुर्नशिक्षण शिबिरात पाठवण्यात येत आहे. उत्तर कोरियाविरोधात बाहेरील देशांमधून सुरू असलेल्या प्रचाराविरोधात किम जोंग यांनी कठोर निर्णय घेण्यात येत आहेत. बाहेरील देशातून येणारे साहित्य, माहितीविरोधात किम यांनी हे कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे, असेही बीबीसीने सांगितले आहे.


दिलासा! लवकरच देशात स्पाइक प्रोटीनयुक्त असणारी स्वस्त Corona Vaccine मिळणार

- Advertisement -