घरताज्या घडामोडी...म्हणून व्हाईट व्हाऊसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलं 'अनफॉलो'

…म्हणून व्हाईट व्हाऊसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलं ‘अनफॉलो’

Subscribe

जगातील महासत्ता अमेरिका कोरोना विषाणूशी लढत येत आहे. याच संकटात भारताने अमेरिकेला मदत केली. भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या गोळीच्या साठ्यातला काही साठा अमेरिका दिला. यानंतर लगेच डोनाल्ड ट्रम्प यांचं भारत प्रेम आणि मोदी प्रेम उफाळून आलेलं पाहायला मिळालं. पण काल अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांचं सरकारी घर आणि कामकाजाचं ठिकाण असलेल्या व्हाईट हाऊसच्या ट्विटर हँडलने पहिल्यांदाच दुसऱ्या देशाच्या प्रमुखाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर हँडल अनफॉलो केलं. त्यासोबतच त्यांनी पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, अमेरिकेतील भारतीय दूतावास, भारतातील अमेरिकी दूतावास आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत केन जस्टर यांना देखील अनफॉलो केलं. याची बरीच चर्चा झाली आणि अनेक भारतात प्रश्न निर्माण झाले. आता व्हाईट हाऊसनं याबाबत उत्तर दिलं आहे.

व्हाईट हाऊसनं असं म्हटलं आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांचा कोणत्याही देशात दौरा असतो तेव्हा त्या देशाचं अधिकृत ट्विटर हँडलला फॉलो केलं जात. जेव्हा फेब्रुवारी महिन्यात डोनाल्ड ट्रम्प भारतात आले तेव्हा व्हाईट हाऊने पंतप्रधान नरेंद्र मोदीसह इतर ट्विटर हँडला फॉलो केलं होत.

- Advertisement -

व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, व्हाईट हाऊस फक्त अमेरिका सरकारी संबंधित असलेल्या ट्विटर हँडला फॉल करते. परंतु राष्ट्राध्यक्ष करत असलेल्या देशांच्या दौऱ्यादरम्यान त्या देशातील प्रमुखांना फॉलो केलं जात. कारण त्यासंदर्भातील मेसेज सतत रिट्विट करता येते. ही एक रुटीन प्रोसेस असल्याचं व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्याने सांगितलं.


हेही वाचा – CoronaVirus: अमेरिकेतील मृतांचा आकडा पुन्हा वाढला; २४ तासांत २ हजार ५०२ जणांचे बळी!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -