सुप्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंटचं हेलिकॉप्टर अपघातात निधन

दिग्गज बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटच हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं आहे. यावेळी त्याच्याबरोबर त्याची १३ वर्षाची मुलगी देखील होती. कोबी ब्रायंट एक बास्केटबॉलमधील महान खेळाडूंमध्ये गणला जातो. ब्रायंटच्या निधनामुळे बास्केटबॉल जगतात दुख: व्यक्त केलं जात आहे. ४१ वर्षीय कोबी ब्रायंटबरोबर आणखी चारजणं या हेलिकॉप्टरमध्ये होते.

सकाळी १०च्या सुमारास हा अपघात झाला. अपघाता दरम्यान दाट धुके पसरले होते. या दाट धुक्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमुळे बचावकार्यातही आडथळा निर्माण झाला. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सगळ्या लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोबी ब्रायंटने आपल्या २० वर्षाच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. कोबी ब्रायंट नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमधून खेळत होता. त्याने ५ चॅम्पियनशीप आपल्या नावावर केल्या आहेत. कोबी ब्रायंट २००८ आणि २०१२ मध्ये ऑलंपिकमध्ये यूएसए टीमसाटी सुवर्णपदक पटकावले होते. २०१८मध्ये डियर बास्केटबॉल नामक शॉर्ट फिल्म साठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.