Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona: कोल्हापूरात गेल्या २४ तासात ७३० नवे रुग्णांची नोंद

Corona: कोल्हापूरात गेल्या २४ तासात ७३० नवे रुग्णांची नोंद

Subscribe

गेल्या २४ तासांत ७३० नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या २६ हजार ३४४ वर पोहोचली आहे.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तर कोल्हापुरातील बाधित रुग्णांची संख्या देखील सातत्याने वाढत आहे. दरम्यान, गुरुवारी प्रथमच कोल्हापूर जिल्ह्याने १ हजारची संख्या ओलांडली होती. मात्र, आज काही अंशी दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांत ७३० नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या २६ हजार ३४४ वर पोहोचली आहे. आजही कोल्हापूर, इंचलकरंजी शहर तसेच हातकणंगले, शिरोळ, करवीर, आजरा आदी तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत.

३५९ जणांनी केली कोरोनावर मात

दरम्यान, एकीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. तर दुसरीकडे एक दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत ३५९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत १६ हजार ७८३ जण बरे झाले आहेत. शिवाय गेल्या २४ तासांत १९ जणांचा आणि आतापर्यंत ८०५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सध्या एकूण ८ हजार ७५७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळाली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – पुणे-मुंबई रेल्वे प्रवास कधी होणार सुरू? मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी केले स्पष्ट


 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -