पारा वाढला म्हणून चालकाने उगवले रिक्षावर गवत

कोलाकाता येथे गरमीचा पारावाढल्यामुळे एका रिक्षा चलाकाने एक वेगळीच शक्कल लढवली आहे. स्वतःच्या रिक्षाच्या छतावर या रिक्षाचालकाने गवत उगवले आहे.

Kolkata
कोलकाता येथील रिक्षा चालक

उन्हाळ्याच्या गरमीपासून वाचण्यासाठी अनेकजन विविध शक्कल लढवतात. मुंबई शहराबरोबर इतर शहरातही गरमीचा पारा वाढत चालला आहे. गरमीमुळे रस्त्यावरील नागरिक घामाघूम झालेले आपल्याला दिसतात. गरमी पासून वाचण्यासाठी अनेकजण बर्षाचा गोळा, किंवा काही तरी थंड खाण्याचा पर्याय निवडतात. अनेकदा दुपारी प्रवास करतान्यासाठी आपण रिक्षा पकडतो. मात्र कोलकाता येथे एका रिक्षाचालकाने उनाच्या गरमीपासून एक भन्नाट युक्ती वापरली आहे. या चालकाने आपल्या रिक्षाच्या छतावरच गवत उगवले आहे. या चालकाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिक्षावर गवत उगवून फिरणाऱ्या या चालकाची रिक्षा पाहून लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

बिजय पाल असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. कोलकाता येथे रिक्षाचालकाचे काम करतात. कोलकाता येथे उन्हाचा पारा अधिक असल्यामुळे अनेकजण विविध पद्धतीचा वापर करतात. यामध्ये बिजय यांची पद्धत वेगळी ठरली आहे. रिक्षाच्या छतावर गवत लावल्यामुळे गरमीचे प्रमाण कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर झाडे लावा व झाडे जगवा याचा संदेशही या चालकाने दिला आहे.