Kolkata Doctor Rape Murder Case : कोलकाता : कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉय हा दोषी असल्याचे न्यायालयाने म्हटने आहे. सियालदह न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने शनिवारी हा निकाल सुनावला आहे. याप्रकरणी सोमवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बन दास यांनी हे प्रकरण सुनावणीस घेतल्यानंतर 57 दिवसांनी निर्णय सुनावला आहे. यावेळी दास यांनी संजय रॉयला दोषी ठरविताना सांगितले की, तुला शिक्षा मिळायलाच हवी. या प्रकरणाची सुनावणी 11 नोव्हेंबर रोजी सुरू झाली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घटनेचा तपास करणाऱ्या सीबीआयने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. (kolkata doctor rape murder case sanjay roy found guilty in sealdah court)
या प्रकरणी गेल्या काही दिवसापासून कोर्टात सुनावणी सुरु होती. आता कोर्टाने संजय रॉय हाच या प्रकरणातील आरोपी असल्याचा निकाल दिला आहे. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान पीडितेचे आई – वडिलही न्यायालय परिसरात उपस्थित होते.
मला खोट्या प्रकरणात अडकवले – संजय रॉय
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मला खोट्या प्रकरणात अडकवल्याचे आरोपी संजयने न्यायालयाला सांगितले. मी असे काहीही केलेले नाही. ज्यांनी खरोखर गुन्हा केला आहे, त्यांची मुक्तता केली जात आहे. यात एका आयपीएस अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे.
गेल्या वर्षी 9 ऑगस्ट रोजी आरजी कर रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाच्या चौथ्या मजल्यावरील सेमिनार हॉलमध्ये पीडितेचा मृतदेह आढळला होता. मृतदेहावर बऱ्याच जखमा देखील होत्या. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मुख्य आरोपी, नागरी स्वयंसेवक संजय राय याला अटक करण्यात आली होती.
हेही वाचा – Champions Trophy 2025 : रोहित शर्माच कर्णधार तर शमीचा कमबॅक, पण या खेळाडूंना डच्चू
शवविच्छेदन अहवालानुसार, आरोपीने आधी पीडितेवर बलात्कार केला आणि मग तिची गळा दाबून हत्या केली. ती मेली आहे याची खात्री करण्यासाठी आरोपीने दोन वेळा तिचा गळ घोटल्याचेही अहवालात म्हटले आहे. दरम्यान, आर.जी. कर महाविद्यालयाने सुरुवातीला पिडीतेने आत्महत्या केल्याचे म्हटले होते. पण हळुहळू एकेक गोष्टी समोर येऊ लागल्या. समोर आलेल्या सत्याने संपूर्ण देश विषण्ण झाला.
या घटनेविरोधात आणि पीडितेला न्याय मिळावा म्हणून आणि सरकारी रुग्णालयात डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कोलकात्यातील कनिष्ठ डॉक्टरांनी बराच काळ आंदोलन केले होता. यामुळे या काळात राज्यातील आरोग्य सेवा देखील जवळपास दोन महिने ठप्प झाल्या होत्या.
हेही वाचा – Jitendra Awhad On Karad : वाल्मीक कराड माझ्या जातीतला पण; काय म्हणाले जितेंद्र आव्हाड