घरदेश-विदेशकोरोना संकटात No Tension! कोलकत्याच्या वैज्ञानिकांनी तयार केलं 'पॉकेट व्हेंटिलेटर'; वजन अवघे...

कोरोना संकटात No Tension! कोलकत्याच्या वैज्ञानिकांनी तयार केलं ‘पॉकेट व्हेंटिलेटर’; वजन अवघे २५० ग्रॅम!

Subscribe

देशात गेल्या एक दीड वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग सुरूच आहे. अशापरिस्थितीत कोरोना बाधित रूग्णांना उपचारासाठी बेड आणि व्हेंटिलेटर यांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे. त्यामुळे या कोरोना प्रादुर्भादरम्यान, देशात व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होताना दिसतोय. या चिंताजनक वातावरणात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे ती, म्हणजे आता कोरोना संकटात कोणतंही टेन्शन नागरिकांना घ्यायची आवश्यकता नाही कारण कोलकत्ता येथील शास्त्रज्ञाने या समस्येवर उपाय शोधला आहे. या शास्त्रज्ञाने कोरोना बाधित रूग्णांसाठी अवघ्या २५० ग्रॅम वजनाच्या पॉकेट व्हेंटिलेटरचा शोध लावला आहे. कोरोनाच्या संसर्गदरम्यान, सध्या या पॉकेट व्हेंटिलेटरची चांगलीच चर्चा होताना दिसतेय.

डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी एक इंजिनिअर असून ते सातत्याने वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लावत असतात. आता त्यांनी बॅटरीवर चालणारं एक पॉकेट व्हेंटिलेटर तयार केलं आहे. यामुळे रुग्णाला तात्काळ उपचार मिळण्यास मदत होऊ शकते. हे व्हेंटिलेटर वापरण्यास अतिशय सोपं आणि स्वस्त आहे.जर एखाद्या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते त्याच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. डॉ. मुखर्जी यांनी असे सांगितले की, कोरोना संकटाच्या काळात त्यांची ऑक्सिजन लेवल ८८ वर पोहोचली होती, तेव्हा माझ्या कुटुंबीयांनी मला रूग्णालयात दाखल केले. यानंतर मी या संकटातून बाहेर आलो. मात्र, यानंतर त्यांच्या डोक्यात रुग्णांची मदत करण्याासाठी एक कल्पना आली. बरे झाल्यानंतर त्यांनी त्यावर कामही सुरू केले आणि ते २० दिवसात तयार झाले.

- Advertisement -

डॉ. मुखर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या डिव्हाइसमध्ये दोन यूनिट आहेत, पावर आणि व्हेंटिलेटर. हे दोन्ही मास्कला जोडलेले असून त्याचे एक बटण दाबताच व्हेंटिलेटर काम करणं सुरू करते आणि स्वच्छ हवा रुग्णापर्यंत पोहोचवते. मुखर्जी यांच्या मते, एखाद्या रुग्णाला कोरोना असल्यास यूवी फिल्टर व्हायरस मारण्यास मदत करतो आणि स्वच्छ हवा रुग्णापर्यंत पोहोचवतो. या व्हेंटिलेटरच्या मदतीनं व्हायरसचा प्रसार कमी होईल. रुग्ण आणि डॉक्टरांना दिलासा मिळेल. मुखर्जी यांनी असाही दावा केला आहे, की ब्लॅक फंगसची प्रकरणं वाढत असताना हे व्हेंटिलेटर रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. यासोबतच याचे वजन केवळ २५० ग्रॅम असून हे बॅटरीवर चालते. विशेष म्हणजे एकदा चार्ज केल्यानंतर हे आठ तासांपर्यंत काम करू शकते. अॅन्ड्रॉइड फोनच्या चार्जरनेही हे चार्ज केलं जाऊ शकते असेही त्यांनी सांगितले.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -