घरCORONA UPDATELockdpwn - नियम पाळा...चित्रपटांच्या पोस्ट प्रोडक्शनला सुरूवात करा!

Lockdpwn – नियम पाळा…चित्रपटांच्या पोस्ट प्रोडक्शनला सुरूवात करा!

Subscribe

तामिळनाडूमधील चित्रपट निर्मात्यांच्या संघटनांनी सरकारकडे चित्रीकरणास संमती द्यावी यासाठी एक पत्र पाठवले होते.

वाढत्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका चित्रपटसृष्टीला बसला आहे. चित्रपटसृष्टीचे कोट्यावधीचे नुकसान यामुळे झाले आहे.  चित्रपट निर्माते, पडद्यामागे काम करणारे कामगार या सर्वांवर लॉकडाऊनचा मोठा परिणाम झाला आहे. त्याचबरोबर अनेक चित्रपटांची पोस्ट प्रोडक्शनची कामं बाकी आहेत. याचा दणका मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड आगदी टॉलिवूडलाही बसला आहे. या परिस्थितीत दाक्षिणात्य चित्रपट निर्मात्यांनी एक मार्ग काढला आहे. निर्मात्यांनी सरकारला एक पत्र लिहिले होते. या पत्राला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. तामिळनाडूमध्ये चित्रपटांच्या पोस्ट प्रोडक्शनला संमती देण्यात आली आहे.

- Advertisement -

तामिळनाडूमधील चित्रपट निर्मात्यांच्या संघटनांनी सरकारकडे चित्रीकरणास संमती द्यावी यासाठी एक पत्र पाठवले होते. चित्रपटांचे काम थांबल्यामुळे दररोज ५०० कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा या पत्रातमध्ये करण्यात आला होता. या पत्राला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी के.पलानीस्वामी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी ११ मे पासून पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरु करण्यास संमती दिली आहे.

हे अटी आणि नियम लागू

लॉकडाउनच्या काळात चित्रपट आणि मालिकांच्या पोस्ट प्रोडक्शनला संमती  पण काही अटी व नियम पाळावे लागणार. यादरम्यान केवळ १५ लोकांना सेटवर हजर राहण्यास परवानगी. या मंडळींना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे अनिवार्य असेल. पोस्ट प्रोडक्शनमध्ये चित्रीकरण करता येणार नाही. मात्र चित्रीकरण झाल्यानंतर केले जाणारे स्पेशल इफेक्ट,  डबिंग,  गाण्यांचे रेकॉर्डिंग, एडिटिंग ही कामे करता येतील.

- Advertisement -

हे ही वाचा – Video – पैठणीपर्यंत नेणाऱ्या त्या गोड स्वप्नांचा प्रवास!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -