कोटक महिंद्रा बँकेच्या FD आणि Saving Account वरील व्याजदरात वाढ; आता इतके मिळेल व्याज?

kotak mahindra bank increased interest rate on fd abd savings accounts know rates here

खाजगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने त्यांच्या बचत खाती आणि मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. यानंतर बँक खातेदार आणि एफडीधारकांना अधिक व्याज मिळेल. यामुळे बँकेचे खातेदार आणि डिपॉजिटर्ससाठी ही आनंदाची बातमी आहे.

कोटक महिंद्रा बँकेने सेविंग अकाऊंट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने आता 4 टक्के व्याजदर वाढवले आहेत, जे पूर्वी 3.5 टक्के होते. बँकेचे हे नवे दर 13 जूनपासून म्हणजेच पुढील सोमवारपासून लागू होतील.

कोटक महिंद्रा बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदर 15 बेस पॉईंट्सने वाढवले आहेत. कोटक महिंद्रा बँकेने त्यांच्या FD वर व्याजदरात केलेली वाढ 10 जून 2022 पासून म्हणजेच उद्यापासून लागू होईल.

बँकेचे विविध कालावधीचे व्याजदर जाणून घ्या

बँकेने एका वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या बँक एफडीवरील इंटरेस्ट रेटमध्ये वाढ केली आहे.

कोटक महिंद्रा बँकेने 365 – 389 दिवसांच्या एफडीचे व्याजदर 5.40 टक्क्यांवरून वाढवून 5.50 टक्के केले आहेत.

कोटक महिंद्रा बँकेने 390 दिवसांच्या एफडीचे व्याजदर 5.50 टक्क्यांवरून वाढवून 5.65 टक्के केले आहेत.

391 दिवस ते 23 महिने म्हणजेच 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी व्याजदर 5.50 टक्क्यांवरून वाढवून 5.65 टक्के करण्यात आले आहेत.


EPFO : UAN शिवाय येतायत अडचणी, PF खातेधारक असा ऑनलाईन करू शकतात जनरेट