घरदेश-विदेशKerala Plane Crash : सहवैमानिकाचा मृतदेह पाहून गरोदर पत्नीची शुद्ध हरपली

Kerala Plane Crash : सहवैमानिकाचा मृतदेह पाहून गरोदर पत्नीची शुद्ध हरपली

Subscribe

कोझिकोडेतील विमान अपघातात मृत्यूमुकी पडलेले पडलेले एअर इंडियाचे सहवैमानिक अखिलेश कुमार शर्मा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या वैमानिकाची पत्नी नऊ महिन्यांची गर्भवती असून दिला या आपल्या पत्नीच्या मृत्यूने धक्का बसला आहे. नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कोझिकोडे येथील विमा अपघातात अखिलेश कुमार शर्मा यांचा मृत्यू झाला होता. ते या विमानाचे सहवैमानिक होते. दिल्ली येथे त्यांचे पार्थिव आणल्यानंतर ग्राऊंड स्टाफ आणि २०० वैमानिकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

वैमानिकाचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी म्हणजे मथुरा येथील गोविंद नगर येथे नेण्यात आले होते. त्यांची पत्नी मेघा या नऊ महिन्यांच्या गर्भवती असल्याने त्यांना अखिलेश यांच्या मृत्यूबाबत आधी कोणतीही माहिती दिली नव्हती. जेव्हा अखिलेश यांचे पार्थिव आणण्यात आले, तेव्हा ते पाहून मेघा यांना विश्वास बसला नाही. हे माझे पती नाहीत, हे कोण आहेत, असे मेघा तिथे असलेल्यांना विचारत होत्या. रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांनी मेघा यांच्याशी व्हिडिओ कॉल करून आपण लवकरच येऊ, असेही सांगितले होते.

- Advertisement -

दुबईहून १९१ प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान केरळमधील कोझीकोडच्या करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरल्याने शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत मुंबईतील वैमानिकासह १८ जणांचा मृत्यू, तर अनेक प्रवासी जखमी झाले. तसेच या विमानाचे दोन्ही वैमानिक कॅप्टन दीपक साठे आणि कॅप्टन अखिलेश कुमार शर्मा यांचाही मृत्यू झाला.

हेही वाचा –

‘पायलट’ यांचं विमान पुन्हा एकदा कॉंग्रेसच्या धावपट्टीवर; राहुल गांधींना भेटणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -