Omicron variant : ओमिक्रॉन विषाणूचा अवघ्या ४५ मिनिंटात शोध लावणाऱ्या किटला परवानगी, जाणून घ्या वैशिष्ट्य आणि किंमत?

ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने आरटीपीसीआरचं किट Crivida Novus तयार करण्यासाठी वैद्यकीय उत्पादन निर्माता क्रिया मेडिकल टेक्नॉलॉजीजला परवाना मंजूर केला आहे. हे किट ४५ मिनिंटामध्ये ओमिक्रॉनचा विषाणू आणि त्याच्याशी संबंधित उप- प्रकारचा शोध घेऊ शकते.

कंपनीचे सीईओ आणि संस्थापक अनु मोतुरी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, हे किट खरेदी करण्यासाठी १५० रूपये अधिक कर भरावे लागतील. हे किट विमानतळावरील एन्ट्री पॉइंट्सवर स्क्रिनिंगसाठी सर्वात योग्य असल्याचं त्यांनी निवेदनात म्हटलंय.

किट निर्मितीची कामं चेन्नईतील उत्पादन कंपनीकडून सुरू करण्यात येईल. कंपनीची सध्या दरमहा ५० लाख चाचणी किट तयार करण्याची क्षमता आहे आणि येत्या दोन आठवडयांमध्ये ते दरमहा १० दशलक्ष चाचणी किटपर्यंत वाढवण्याची योजना आहे.

दरम्यान गेल्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधानोम म्हणाले होते की, जगातील काही भागांमध्ये कोरोनाचे मृत्यू वाढत आहेत. त्यामुळे निर्बंध शिथील करण्याची घाई करू नका. तसेच रुणांसाठी ओमिक्रॉन कमी गंभीर असू शकतो, असं युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ फ्लोरिडा कॉलेज ऑफ पब्लिक हेल्थमधील जेसन सालेमी म्हणाल्या.


हेही वाचा : शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश, जन्मोत्सव सोहळ्यासाठी पाचशे जणांच्या उपस्थितीसाठी मान्यता