Kulgam Encounter: कुलगाममध्ये दोन ठिकाणी एन्काउंटर: TRFच्या अफाक सिंकदरसह ५ दहशतवाद्यांना केले ठार

kulgam encounter five terrorist killed in pombai and gopalpora villages in jammu kashmir
Kulgam Encounter: कुलगाममध्ये दोन ठिकाणी एन्काउंटर: TRFच्या अफाक सिंकदरसह ५ दहशतवाद्यांना केले ठार

जम्मू-काश्मीरच्या कुलगामध्ये आज सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलाच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या एनकाउंटरमध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. खात्मा केलेल्या दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याची ओळख पटली आहे. दहशतवादी संघटना द रेजिस्टेंस फ्रंट (TRF)चा कमांडर अफाक सिंकदर अशी एका दहशतवाद्याची ओळख समोर आली आहे. काश्मीर क्षेत्रातील पोलिस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले की, कुलगामच्या पुम्बाई आणि गोपालपोरा गावातील चकमकीत सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना ठार केले. दोन्ही ठिकाणी अजूनही चकमक सुरू आहे.

यापूर्वी १५ नोव्हेंबरला सुरक्षा दलात श्रीनगरच्या हैदरपोरामध्ये दोन दहशतावाद्यांना ठार केले होते. पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, यावर्षी आतापर्यंत १३५ हून जास्त दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने ठार केले. खोऱ्यात ३० परदेशीसह १५०-२०० दहशतवादी अजूनही सक्रीय आहेत.

दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाचे दहशतवाद्यांविरोधात मोठ्या स्तरावर मोहीम सुरू आहे. आज दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवादी सहकाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून आयईडी जप्त करण्यात आले. एसएसपी पुलवामा गुलाम जिलानी म्हणाले की, सर्कुलर रोड पुलवामामध्ये पोलीस आणि लष्करी संयुक्त नाकेबंदी दरम्यान दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचे दोन सक्रीय सहकाऱ्यांना पकडले. अटक करण्यात आलेल्या या दहशतवादी सहकाऱ्यांची ओळख पुलवामातील रहिवाशी आमिर बशीर डार आणि शोपियां रहिवाशी मुख्यातर अहमद भट अशी आहे.


हेही वाचा – पाकिस्तान झुकले; कुलभूषण जाधव यांना मिळाला मोठा दिलासा