घरदेश-विदेशरेल्वे स्थानकावर पून्हा सुरु होणार "कुल्हड वाली चाय"

रेल्वे स्थानकावर पून्हा सुरु होणार “कुल्हड वाली चाय”

Subscribe

रेल्वे स्थानकावर प्लास्टिक आणि कागदाच्या ग्लासमध्ये चहा पिणाऱ्यांसाठी एक चांगील बातमी आहे. रेल्वे स्थानकावर असलेल्या स्टॉलवर येत्या काही काळात कुल्हडमध्ये (मातीचे भांडे) चहा मिळणार आहे.

रेल्वे स्थानकावर चहा पिणाऱ्यांसाठी कुल्हड (मातीचे भांडे) चा वापर पुन्हा सुरु होणार आहे. माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी १५ वर्षापूर्वी स्टेशनवर मिळणाऱ्या चहासाठी कुल्हडची सुरुवात केली होती. मात्र कालांतराने त्याची जागा प्लास्टिक आणि कागदाच्या ग्लासांनी घेतली. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी नुकतीच ही घोषणा केली आहे. वाराणसी आणि रायबरेली स्थानकादरम्यान कुल्हडचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत.

कुंभारांसाठी अच्छे दिन

या निर्णयामुळे प्रवाशांना आता कुल्हडमध्ये चहा पिण्यासाठी मिळणार आहेच मात्र यामुळे अनेक कुभारांनाही रोजगार मिळणार आहे. या निर्णयामुळे कुंभारांना मोठी बाजारपेठ मिळणार आहे. जेवणाचे पदार्थ आणि पेय हे मातीच्या भांड्यांत द्यावी असे आदेश आयआरसीटीसीला देण्यात आल्याचे रेल्वे झोनल अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

खादी ग्रामोद्योगने केली होती विनंती

खादी ग्रामोद्योग व्यवसायच्या अध्यक्ष वी. के. सक्सेना यांनी मागील वर्षी डिसेंबर महिन्यात हा प्रस्ताव ठेवला होता. परिसरातील कुंभारासाठी रोजगार निर्माण करावा अशी मागणी त्यांनी केली होती. “आम्हाला विजेवर चालणारे चाक देण्यात आलीत त्यामुळे आमची उत्पादन क्षमता वाढली. या चाकामुळे आम्ही दिवसातून १०० ते ६०० कप तयार करतो. आमच्या प्रस्तावामुळे आता लाखो कुंभारांना होणार आहे.” असे सक्सेना यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -