(Kumar Vishwas about Kareena Kapoor) लखनऊ : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानंतर लोकप्रिय कवी कुमार विश्वास यांनी आता अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. एका कार्यक्रमात कुमार विश्वास यांनी सैफ अली खान आणि करीना कपूर यांचे नाव न घेता मुलाचे नाव तैमूर ठेवल्याबद्दल टीका केली. (Kumar Vishwas criticized for naming son Taimur)
उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधील एक कार्यक्रमात कुमार विश्वास यांनी करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्यावर हल्लाबोल केला. देशाला काय हवे आहे, हे मायानगरीतील लोकांना जाणून घ्यावे लागेल. लोकप्रियता आम्ही मिळवून देणार, तिकीट आम्ही खरेदी करणार, पैसे आम्ही देणार, तुम्हाला हीरो आणि हीरोइन आम्ही बनवणार आणि तुमच्या तिसऱ्या लग्नानंतर जे बाळ जन्माला येईल, त्याचे नाव बाहेरून आलेल्या आक्रमणकाऱ्याचे ठेवणार… हे चालणार नाही, असे त्यांनी सुनावले आहे.
View this post on Instagram
इतकी नावे आहेत, त्यापैकी कोणतेही नाव ठेवता आले असते. रिझवान, उस्मान किंवा युनूस असे कोणतेही एक नाव ठेवता आले असते. तुम्हाला एकच नाव मिळाले? ज्या लंगड्या व्यक्तीने बाहेरून येऊन भारतातील माता-भगिनींवर अत्याचार केला, त्याच लफंग्या व्यक्तीचे नाव तुम्हाला आपल्या मुलासाठी मिळाले? असा सवाल करून कुमार विश्वास म्हणाले, आता त्याला हीरो बनवायचा प्रयत्न केला तर त्याला खलनायकही होऊ देणार नाही, हे लक्षात ठेवा.
कुमार विश्वास यांनी थेटपणे कोणाचे नाव घेतले नसले तरी, त्यांनी सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्यावर शरसंधान केल्याचे स्पष्ट होते. सैफ आणि करीनाने आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवले असून त्यावेळी देखील बराच वादंग झाला होता. अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. (Kumar Vishwas about Kareena Kapoor: Kumar Vishwas criticized for naming son Taimur)
हेही वाचा – SS UBT Vs Mahayuti : वेगाच्या आणि कामाच्या बाबतीत सगळीच बोंब, ठाकरे गटाचा राज्य सरकारवर हल्लाबोल