(Kumar Vishwas on Baba Ramdev) नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे एकेकाळचे निकटवर्ती समजले जाणारे प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कुमार विश्वास यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांच्या मीठ उत्पादनावर केलेल्या कुमार विश्वास यांनी केलेल्या टिप्पणीमुळे सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. (Kumar Vishwas targets Baba Ramdev over salt production)
स्ट्रीट्स ऑफ मेरठच्या इन्स्टाग्राम हँडलवरून कुमार विश्वास यांचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कुमार विश्वास बाबा रामदेव यांचे थेट नाव न घेता म्हणतात, नवरात्रीच्या काळात मी त्यांचे मीठ विकत घेतले. ते त्यांचे उत्पादन अशा प्रकारे विकतात की, तुम्ही ते विकत घेतले नाही तर तुम्हाला त्याच दिवशी सनातन धर्माचा त्याग करावा लागेल! शिवाय, त्या मीठावर असा संदेश लिहिला होता की, इस्लामुद्दीनही ते विकत घेईल.
हेही वाचा – ST Bus : आता शहराप्रमाणे ग्रामीण भागातही धावणार इलेक्ट्रिक बस; परिवहन मंत्र्यांची माहिती
या मिठाच्या पाकिटावर लिहिले होते, ’25 लाख वर्षे जुन्या हिमालयातून काढलेले मीठ.’ अशाने माणूस भावूक होतो. मनातल्या मनात कल्पना करायला लागतो, बाबा धोतर सांभाळत हिमालयावर कसे चढले असतील… फावड्याने मीठ कसे काढले असेल…. बाळकृष्ण टोपली घेऊन मागे उभे असतील…, अशी खोचक टीका त्यांनी केली.
View this post on Instagram
मिठाच्या पाकिटाखाली लिहिलेली ओळ आणखीनच आश्चर्यकारक असल्याचे त्यांनी सांगितले. वर लिहिले होते ’25 लाख वर्षे जुन्या हिमालयातून काढलेले मीठ’, आणि त्याच्या खाली कोपऱ्यात लिहिले होते ‘एक्सपायरी डेट 7 फेब्रुवारी’. लोक म्हणाली, बाबांनी अगदी वेळेवर मीठ बाहेर काढले असे दिसते, नाहीतर तिथेच पडून ते सडले असते, असे कुमार विश्वास म्हणताच उपस्थितांमध्ये हास्य लकेर उमटली.
या व्हिडीओमध्ये कुमार विश्वास यांनी बाबा रामदेव यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे काही लोक संतप्त झाले आहेत. स्वदेशीला पुढे नेण्यात योगगुरूंनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, याची आठवण त्यांनी कुमार विश्वास यांना करून दिली आहे. त्याचबरोबर, कुमार विश्वास यांच्याकडून ही अपेक्षा केली नसल्याचेही काहींनी म्हटले आहे. तर, काही युझर्सनी कुमार विश्वास यांच्या निर्भय टिप्पणीबद्दल कौतुकही केले आहे. (Kumar Vishwas on Baba Ramdev: Kumar Vishwas targets Baba Ramdev over salt production)
हेही वाचा – Manu Bhaker : देशासाठी पदक जिंकूनही…; खेलरत्न पुरस्कार यादीतून वगळल्यानंतर मनू भाकरची नाराजी