घरदेश-विदेशकुंभमेळ्याचे महापर्व सुरु; आज पहिले शाही स्नान

कुंभमेळ्याचे महापर्व सुरु; आज पहिले शाही स्नान

Subscribe

कुंभमेळ्याचे महापर्व आज पासून सुरु झाले असून मकरसंक्रांतीच्या पहिल्या शाही स्नानासाठी संत महंतांच्या शोभा यात्रांना प्रारंभ झाला आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यासाठी देश – विदेशातून साधू, संत मोठ्या संख्येने येतात. मकर संक्रांतीनिमित्त मंगळवारी पहाटे गंगा, यमुना, सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमस्थळी नागा साधू आणि अन्य आखाड्याचे साधू, संत यांनी आज पहिले शाही स्नान केले आहे. त्रिशूळ, गदा आणि तलवारी नाचवत, डमरु वाजवत कुंभमेळ्यातील मकरसंक्रांतीच्या पहिल्या शाही स्नानासाठी संत महंतांच्या शोभा यात्रांना प्रारंभ झाला. कडाक्याच्या थंडीत देखील धार्मिक आस्था बाळगणारे दीड कोटी भाविक कुंभमेळ्यात दाखल झाले आहेत. आखाडा परिषदेच्या शिरस्त्याप्रमाणे आणि परंपरेनुसार पहाटे महाविर्वाणी आणि अटल आखाड्याने संगमाकडे प्रस्थान ठेवले तर निरंजनी आणि आनंद आखाड्याचा शोभायात्राचा प्रारंभ केला.

कुंभमेळ्यात महापर्व सुरु

सूर्याचा मकर राशीत प्रवेश होण्याबरोबरच तीर्थराज प्रयाग येथील संगमतटावर कुंभमेळ्यात महापर्व सुरु झाले. भाविकांनी सकाळी ५ वाजल्यापासून उत्साहात शाही स्नानाचा आनंद घेतला. सर्व आखाड्यांना शाही स्नान करण्यासाठी ३० मिनिट ते ४५ मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. यावेळेत स्नान करण्यात येते.

- Advertisement -

कुंभमेळ्यात १३ आखाड्यांचा सहभाग

गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर कुंभ स्नान होत असून स्नानास जाणाऱ्या संत महंतांचं दर्शन आणि आशिर्वादासाठी रस्त्याच्या दुतर्फा भक्तांची मोठी गर्दी झाली आहे. कुंभासाठी सोडलेल्या खास रेल्वे, एसटी आणि खासगी वाहनांद्वारे लाखो भाविक प्रयागराजला पोहोचत आहेत. संगमाकडे जाणाऱ्या सर्वट मार्गांवर सोमवार पासून प्रवेशबंदी देखील करण्यात आली आहे. वाहने शहराबाहेर रोखली गेल्याने भाविकांना सुमारे १० ते १२ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. तसेच याठिकाणी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्ते ठेवला असून संगम तटावर सुरक्षा रक्षत तैनात आहेत. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे शाही मिरवणूक मार्गावर नजर ठेवली जात आहे. त्याचप्रमाणे दुपारी ४ वाजेपर्यंत विविध आखड्यांचं शाही स्नान चालणार आहे. शैव पंथीयांचे १० तर वैष्णवांचे ३ असे एकूण १३ आखाडे या कुंभमेळ्यात सहभागी झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -