आईची हतबलता! रुग्णवाहिका मिळाली नाही म्हणून खाद्यांवरून नेला मुलाचा मृतदेह, युपीतील घटना

मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी ती रुग्णवाहिकेच्या शोधात होती. मात्र, तिला रुग्णवाहिका मिळाली नाही. ती बराचवेळ मुलाचा मृतदेह आपल्या खांद्यावर ठेवून रुग्णवाहिका शोधत होती. अखेर एका बाईकवरून तिने आपल्या मुलाचा मृतदेह घरी नेला.

रुग्णवाहिका वेळेत मिळाली नाही म्हणून एका आईला आपल्या चिमुकल्या मुलाचा मृतदेह खांद्यावरून घेऊन जाण्याची वेळ आली. उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कुशीनगरच्या तमकुहीराज येथे राहणाऱ्या वहाब अन्सारी यांचा पाच वर्षांच्या मुलाचा संपर्क विजेच्या तारेसोबत आला. त्यामुळे त्याला जोराचा झटका बसला. खेळता खेळता हा प्रकार घडल्याने नेमकं काय घडतंय याची त्याच्या आईला कल्पनाच नव्हती. त्यामुळे त्याच्या आईने त्याला तत्काळ नजिकच्या सरकारी रुग्णालयात नेलं. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

हेही वाचा – तामिळनाडूतील ‘त्या’ मंदिरातील मूर्ती देवाची नव्हे बुद्धांची, हायकोर्टाकडून ताबा पुरातत्व विभागाकडे

मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी ती रुग्णवाहिकेच्या शोधात होती. मात्र, तिला रुग्णवाहिका मिळाली नाही. ती बराचवेळ मुलाचा मृतदेह आपल्या खांद्यावर ठेवून रुग्णवाहिका शोधत होती. अखेर एका बाईकवरून तिने आपल्या मुलाचा मृतदेह घरी नेला.

रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध झाल्या नसल्याच्या अशा अनेक घटना उत्तर प्रदेशात घडल्या आहेत. मात्र, सरकार यासाठी काहीच कार्यवाही करताना दिसत नाही. अशा घटना घडल्या की नेत्यांकडून मोठमोठी आश्वासनं दिली जातात. मात्र, रुग्णवाहिकांची सोय केली जात नाही. दोषींविरोधात कारवाई करू असं फक्त आश्वासन दिलं जातं, मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होत नाही.

हेही वाचा देशाची संपत्ती मित्रांना फ्री फंडमध्ये विकताहेत, राहुल गांधींचा मोदींना टोला

माजी आमदार कुमार लल्लू यांनी याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. सरकार आणि आरोग्य विभाग निष्क्रीय असल्याचा आरोप करण्यात आला आहे.