घरट्रेंडिंग'टोमॅटिना' फेस्टिव्हल 2018 : स्थानिकांची धमाल

‘टोमॅटिना’ फेस्टिव्हल 2018 : स्थानिकांची धमाल

Subscribe

या वर्षीच्या 'ला टोमॅटिना' फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत, तिथल्या स्थानिकांनी या धमाल सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला

जगभारात चालणाऱ्या अजब-गजब स्पर्धा आणि फेस्टिव्हल्स आपल्याला नवीन नाहीत. त्यातीलच एक म्हणजे दरवर्षी स्पेनमध्ये रंगणारा ‘ला टोमॅटिना फेस्टिव्हल’. स्पेनमध्ये यावर्षीच्या ‘टोमॅटिना फेस्टिव्हल’ला सुरुवात झाली असून, स्थानिक लोकांसह हाजारो पर्यटक या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या बुधवारी ‘ला टोमॅटिना फेस्टिव्हल’ला प्रारंभ होतो. उपलब्ध माहितीनुसार ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत म्हणजेच ३१ ऑगस्टपर्यंत हे फेस्टिव्हल सुरु राहते. जगभरातील हजारो पर्यटक दरवर्षी या टोमॅटिना फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत असतात. एका रिसर्चद्वारे समोर आलेल्या आकडेवारीनुसार खास या फेस्टिव्हलसाठी १०० ते १२० टन इतके टोमॅटो पुरवले जातात. मात्र, त्याताही खाण्यायोग्य नसलेल्या किंवा जुन्या झालेल्या टॉमेटोंचा जास्तीत जास्त वापर केला जातो. स्पेनमधील लोक त्यांच्या मनोरंजनासाठी ‘१९५४’ सालापासून हा खेळ खेळत आहेत. या खेळामध्ये एकमेकांच्या अंगावर टॉमेटो फेकायचे असतात. यादरम्यान सर्व लोक एकमेकांना टॉमेटोने अक्षरश: रंगवून टाकतात. रंगांऐवजी टॉमेटोने रंगपंचमी खेळण्यासाखाच हा प्रकार म्हणावा लागेल. काही लोक या फेस्टिव्हलला ‘टोमॅटोंनी खेळले जाणारे युद्ध’ असं देखील म्हणतात.

हेही पाहा : Video: मिरच्या खाण्याची अनोखी स्पर्धा

la tomatina festival 2018

- Advertisement -

la tomatina festival 2018

बॉलीवूडचा ‘टोमॅटिना’ फेस्टिव्हल

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या बॉलीवूडपटामध्येही हा टोमॅटिना फेस्टिव्हल चित्रीत करण्यात आला होता. जिंदगी..मधील एका गाण्यामध्ये चित्रपटाचे कलाकार टोमॅटिना फेस्टिव्हलचा आनंद लुटताना दाखवले होते. उपलब्ध माहितीनुसार या खास गाण्याच्या शूटसाठी तब्बल १६ टन टोमॅटो वापरण्यात आले होते. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये ऋतिक रोशन, कटरिना कैफ, फरहान अख्तर, अभय देओल आणि कलकी कोचलिन या कलाकारांनी मुख्य भूमिका बजावल्या होत्या.

- Advertisement -

znmd

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -