घरCORONA UPDATEकेंद्रीय कामगार मंत्रालयाच्या ११ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या ११ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

Subscribe

केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या ११ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याच समोर आलं आहे. तर निवडणूक आयोगातील एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयातील अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं सोमवारी समोर आलं. श्रम शक्ती भवनमधील मंत्रालयातील ११ अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याबाबतची माहिती ‘आज तक’ या वॉत्तसंस्थेने दिली आहे. दरम्यान, कामगार मंत्रालयाशिवाय निवडणूक आयोगातील एका अधिकाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. ईव्हीएम विभागात कार्यरत एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

- Advertisement -

आतापर्यंत केंद्रीय मंत्रालयातील अनेक अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्य मंत्रालय, संरक्षण मंत्रालय तसंच कामगार मंत्रालयातील अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अलीकडेच दिल्ली मेट्रो, दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर ऑफिसचे काही अधिकारीदेखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तथापि, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सरकारी कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांच्या कामासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये मास्क घालणे, सामाजिक अंतर ठेवणे, गर्दी न करणे, सभांमध्ये अंतर ठेवणे अशा नियमांचा समावेश आहे.


हेही वाचा – सनदी अधिकाऱ्यांच्या ‘यशोधन’ इमारतीत खळबळ; २८ कोरोना पॉझिटिव्ह!

- Advertisement -

देशात कोरोना विषाणूचे संकट गडद होत चाललं आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सुमारे दहा हजार नव्या रुग्णांची नोंद होत आहे. देशात गेल्या २४ तासांत सुमारे ९ हजार ९८३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर २०६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता २ लाख ५६ हजार ६११ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये १ लाख २५ हजार ३८१ रुग्णांवर उपचार सुरु असून १ लाख २४ हजार ०९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ७ हजार १३५ जणांचा मृत्यू झालेला आहे.


हेही वाचा – ११ जूनला मान्सून मुंबइत दाखल होणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -