घरताज्या घडामोडीगोध्रा दंगलीतील 'त्या' 22 जणांची निर्दोष मुक्तता; नेमके प्रकरण काय?

गोध्रा दंगलीतील ‘त्या’ 22 जणांची निर्दोष मुक्तता; नेमके प्रकरण काय?

Subscribe

2002 साली गोध्रामध्ये दंगल झाली असून, त्यामध्ये 17 जणांचा बळी गेला होता. आता याच गोध्रा दंगलीतील 22 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. गुजरातमधील पंचमहल जिल्ह्यातील न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

2002 साली गोध्रामध्ये दंगल झाली असून, त्यामध्ये 17 जणांचा बळी गेला होता. आता याच गोध्रा दंगलीतील 22 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. गुजरातमधील पंचमहल जिल्ह्यातील न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. पुरावे अपुरे असल्याचे कारण देत या 22 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. (lack of evidence 22 accused acquitted in gujarat riots and murder of 17)

गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील हलोल शहरातील न्यायालयानं गोध्रा दंगली प्रकरणात (Godhra Riots Case) पुराव्याअभावी 22 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्यांवर दोन मुलांसह अल्पसंख्याक समाजातील 17 जणांची हत्या केल्याचा आरोप होता. “अतिरिक्त सत्र न्यायाधीश हर्ष त्रिवेदी यांनी सर्व 22 आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. त्यापैकी आठ जणांचा खटल्याच्या सुनावणीदरम्यान मृत्यू झाला होता. तसेच, जिल्ह्यातील देलोल गावात दोन मुलांसह अल्पसंख्याक समाजातील 17 लोकांची हत्या आणि दंगल घडवल्याच्या प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे”, असे बचाव पक्षाचे वकील गोपाल सिंह सोलंकी यांनी सांगितले.

- Advertisement -

नेमके प्रकरण काय?

27 फेब्रुवारी 2002 रोजी पंचमहाल जिल्ह्यातील गोध्रा शहराजवळ जमावाने साबरमती एक्स्प्रेसची एक बोगी पेटवल्यानंतर जातीय दंगली झाल्या. बोगी जळण्याच्या घटनेत 59 प्रवासी असून त्यापैकी बहुतेक प्रवासी ‘कारसेवक’ होते. ते अयोध्येहून परतले होते. देलोल गावात झालेल्या हिंसाचारानंतर हत्या आणि दंगलीशी संबंधित भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर आणखी एका पोलीस निरीक्षकानं घटनेच्या जवळपास दोन वर्षांनी नवा गुन्हा नोंदवला आणि दंगलीत सहभागी असल्याच्या आरोपाखाली 22 जणांना अटक केली.

- Advertisement -

हेही वाचा – बालाकोट हवाईहल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान होते आण्विक युद्धाच्या तयारीत, अमेरिकेकडून गौप्यस्फोट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -