घरताज्या घडामोडी'3 idiots'चे रिअल रँचो करणार उपोषण; पंतप्रधानांना म्हणाले, 'वाचलो तर भेटू'

‘3 idiots’चे रिअल रँचो करणार उपोषण; पंतप्रधानांना म्हणाले, ‘वाचलो तर भेटू’

Subscribe

'3 idiots'चे रिअल रँचो आणि समाजसुधारक सोनम वांगचूक उपोषण करणार आहेत. लडाखच्या दुर्गतीकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी सोनम वांगचूक २६ जानेवारीपासून पाच दिवस उपोषण करणार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे उणे ४० अंश (- 40) तापमानात सोनम वांगचूक उपोषण करणार आहे.

‘3 idiots’चे रिअल रँचो आणि समाजसुधारक सोनम वांगचूक उपोषण करणार आहेत. लडाखच्या दुर्गतीकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी सोनम वांगचूक २६ जानेवारीपासून पाच दिवस उपोषण करणार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे उणे ४० अंश (- 40) तापमानात सोनम वांगचूक उपोषण करणार आहे. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा दिला आहे. (Ladakh Sonam Wangchuk to launch hunger strike demanding constitutional safeguards)

संरक्षणात्मक पावले न उचलल्यास लेह-लडाखमधील दोन तृतीयांश हिमनद्या नष्ट होतील, असे काश्मीर विद्यापीठ व इतर संस्थांना नुकताच केलेल्या संशोधनात आढळून आले. या पार्श्वभूमीवर लडाख वाचविण्यासाठी सोनम वांगचूक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हाक दिली आहे.

- Advertisement -

सोनम वांगचूक २६ जानेवारीपासून पाच दिवस उपोषण करणार असून, ते उणे ४० अंश तापमान असलेल्या खार्दुंगला येथे उपोषण करणार आहेत. तसेच, सोनम यांनी पंतप्रधानांसाठी एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी लडाखमधील आदिवासी, उद्योग व हिमनद्यांबद्दल बोलत आहेत.

“लडाख व इतर हिमालयीन प्रदेशांना औद्योगिक शोषणापासून वाचवा. कारण, याचा येथील लोकांच्या जीवनावर परिणाम होईल. याकडे तुमचे लक्ष वेधण्यासाठी मी उपोषण करत आहे. यातून जिवंत राहिलो तर तुम्हाला पुन्हा भेटेन, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे लडाखबाबत त्वरेने पावले उचलण्याची मागणी केली आहे”, अशा शब्दांत सोनम वांगचूक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –  मुंबई महापालिकेवर दरोडा टाकणारे डाकू म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी – आशिष शेलार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -