घरताज्या घडामोडीCorona Vaccination: दोन वर्षांच्या चिमुरड्यावर कोरोना लसीचे जगातील पहिले ट्रायल कानपूरमध्ये

Corona Vaccination: दोन वर्षांच्या चिमुरड्यावर कोरोना लसीचे जगातील पहिले ट्रायल कानपूरमध्ये

Subscribe

पुढील महिन्यात कोव्हॅक्सिनचे नेजल स्प्रे उपलब्ध होईल.

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी काही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. पण चिमुकल्यांना अजूनपर्यंत लस दिली जात नाही आहे. त्यामुळे आता जगातील पहिले कोरोना लसीचे ट्रायल दोन वर्षांच्या चिमुरड्यावर कानपूरमध्ये केले जाणार आहे. आतापर्यंत या वयोगतील मुलांवर कोरोना लसीचे ट्रायल झाले नव्हते. भारत बायोटेकेची स्वदेशी लस कोव्हॅक्सिनचे ट्रायल मुलांवर करण्यास सुरुवात केली आहे. आता सहा वर्षांपासून ते १२ वर्षांपर्यंत आणि १२ वर्षांपासून ते १८ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मुलांचा लस दिली आहे. पुढील महिन्यात कोव्हॅक्सिनचा नेजल स्प्रे उपलब्ध होईल, अशी आशा आहे.

मंगळवारी आर्यनगर स्थित प्रखर रुग्णालयात कोव्हॅक्सिन लसीचे मुलांवर ट्रायल सुरू झाले आहे. दोन वर्षांपासून ते सहा वर्षांपर्यंत, सहा वर्षांपासून ते १२ वर्षांपर्यंत आणि १२ वर्षांपासून ते १८ वर्षांपर्यंत असे तीन गटात विभाजन केले आहे. पहिल्या दिवशी १२ ते १८ वर्षांच्या ३० मुलांचे स्क्रीनिंग केली. २० निवडक जणांना लसीचा डोस दिला गेला.

- Advertisement -

त्यानंतर बुधवारी सहा ते १२ वर्षांच्या १० मुलांचे स्क्रीनिंग केली आहे. यामधील पाच जणांना लस देण्यात आली. लस दिल्यानंतर ४५ मिनिटांपर्यंत मुलांना देखरेखीखाली ठेवण्यात आले. सर्वजण लस घेतल्यानंतर व्यवस्थित होते, फक्त दोन मुलांना डोस दिल्यानंतर लालसरपणा आला. ही स्थिती सामान्य आहे, असे म्हटले जात आहे.

ट्रायलचे मुख्य तपासनीस वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ आणि माजी डीजीएमइ प्राध्यापक वीएन त्रिपाठी म्हणाले की, दोन वर्षांच्या मुलांवर कोरोना लसीचे जगातील पहिले ट्रायल आहे. यापूर्वी छोट्या मुलांवर ट्रायल झाले नाही आहे. आता पुढील टप्प्यात दोन ते सहा वर्षांच्या वयोगटातील मुलांचे ट्रायल आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Bharat Biotech: जुलैमध्ये COVAXIN फेज ३ च्या संपूर्ण ट्रायल डेटा सार्वजनिक करण्यात येणार


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -