घरताज्या घडामोडीमुलांना दिली जात आहे एक्सपायरी डेट झालेली लस?

मुलांना दिली जात आहे एक्सपायरी डेट झालेली लस?

Subscribe

महिलेचे ट्वीट व्हायरल झाले असून यात तिने तिच्या मुलाला एक्सपायरी डेट उलटून गेलेली लस देण्यात आल्याचा दावा केला आहे.

देशात कोरोनाबरोबरच ओमीक्रॉनने थैमान घातल्याने आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. याचदरम्यान, एका महिलेचे ट्वीट व्हायरल झाले असून यात तिने तिच्या मुलाला एक्सपायरी डेट उलटून गेलेली लस देण्यात आल्याचा दावा केला आहे. यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

- Advertisement -

नवनीता असे टि्वट केलेल्या महिलेचे नाव असून तिने टि्वट मध्ये म्हटले आहे की माझा मुलगा लस घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी लसीची एक्सपायरी डेट उलटल्याचे माझ्या लक्षात आले. यावर मला एक पत्र दाखवण्यात आले ज्यात लिहले होते की लसीचा काळ वाढवण्यात आला आहे. असे का बरे असावं कुठल्या आधारावर ? लशींचा पुरवठा संपवण्यासाठी मुलांवर प्रयोग सुरू आहे का ? असे तिने या टि्वटमध्ये म्हटले आहे. दरम्यान महिलेचे हे टि्वट व्हायरल झाल्याने पालक आणि मुलंही धास्तावली आहेत. यावर अनेकजण उलस सुलट प्रतिक्रिया देत आहेत. यामुळे या सुरु असलेल्या गोंधळावर कोवॅक्सीन लस निर्माण करणारी कंपनी भारत बायोटेकने स्पष्टीकरण दिले आहे. कोवॅक्सीनची एक्सपायरी डेट ९ महिने होती ती वाढवण्यात आली असून ती आता १२ महिने करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. तसेच लशीच्या व्हायल री लेबल करण्यात येणार आहे. डीजीसीआयने अभ्यास करुनच लशीच्या कालावधीत वाढ केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -