घरदेश-विदेशमहिला पोलीस बनली एमबीबीएसची विद्यार्थिनी, चलाखीने केला कॉलेजमधील रॅगिंगचा पर्दाफाश

महिला पोलीस बनली एमबीबीएसची विद्यार्थिनी, चलाखीने केला कॉलेजमधील रॅगिंगचा पर्दाफाश

Subscribe

Ragging | कॉलेजमध्ये रॅगिंग होत असल्याची तक्रार पीडित विद्यार्थींनीनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या हेल्पलाईन क्रमांकावर केली होती. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात २४ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून या विद्यार्थ्यांचा शोध सुरू होता.

पोलिसांनी अनोखी युक्ती लढवत एका कॉलेजमधील रॅगिंगचा पर्दाफाश केला आहे. एका २४ वर्षीय महिला पोलिसाला अंडरकवर करत कॉलेजमध्ये सुरू असलेले अनिष्ट प्रकार उघडीस आणले आहेत. इंदूरमधील शासकीय महात्मा गांधी स्मृति चिकित्सा महाविद्यालायत असा प्रकार घडला असून पोलिसांनी याप्रकरणी ११ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच, कॉलेजने या विद्यार्थ्यांना निलंबित केलं आहे.

कॉलेजमध्ये रॅगिंग होत असल्याची तक्रार पीडित विद्यार्थींनीनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या हेल्पलाईन क्रमांकावर केली होती. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात २४ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून या विद्यार्थ्यांचा शोध सुरू होता.

- Advertisement -

हेही वाचा – यंदाच्या वर्षात देशभरात 3 हजार किलोपेक्षा अधिक सोने जप्त, केरळात सर्वाधिक तस्करी

पीडित विद्यार्थींनीनी दिलेल्या तक्रारीत संपूर्ण प्रकरण विषद करण्यात आलं होतं. परंतु, आरोपींची नावे किंवा इतर कोणीतीही माहिती देण्यात आली नव्हती. सोशल मीडियावर झालेल्या संवादाचे स्क्रीशॉट देण्यात आले होते. परंतु, संबंधित विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर लपवण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं.

- Advertisement -

याप्रकरणी छडा लावण्याकरता पोलिसांना कॉलेजमध्ये पहारा देणं गरजेचं होतं. पण पोलिसांच्या भितीने कोणीही असं कृत्य पुन्हा करणार नाही, याची पोलिसांना खात्री होती. त्यामुळे काहीतरी नवी शक्कल लढवावी लागणार होती. त्यादृष्टीने पोलिसांनी २४ वर्षीय तरुण महिला पोलिसालाच कॉलेजमध्ये विद्यार्थीनी बनवून पाठवलं.

इंदूरच्या शासकीय महात्मा गांधी स्मृति चिकित्सा महाविद्यालायत संबंधित २४ वर्षीय तरुण महिला एमबीबीएसची विद्यार्थीनी म्हणून रोज जाऊ लागली. तेथील कॅटिंनमध्ये बसून नवनव्या ओळखी करू लागली. तसंच, आणखी एका महिला पोलिसाला नर्स बनवून रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं. तर, दोन पोलिसांना महाविद्यालयातील भोजनालयात कर्मचारी बनवून रॅगिंग प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान देण्यात आले होते. या सर्वांनी आपलं काम एकदम चोख बजावत त्या ११ विद्यार्थ्यांचा छडा लावलाच, शिवाय रॅगिंगचा संपूर्ण तपशीलही पोलिसांच्या हाती मिळाला.

हेही वाचा – ४० कोटी जनता दारिद्र्यरेषेच्या बाहेर, राज्यसभेत सरकारकडून माहिती

कॉलेजमधील सिनिअर्स विद्यार्थ्यांकडून ज्युनिअर्स विद्यार्थ्यांवर रॅगिंग केले जात होते. त्यांच्या कपडे आणि राहणीमानावर त्यांना टार्गेट केले जात होते. तसंच, अश्लील कामे करण्यासही त्यांना भाग पाडलं जात होतं, अशी धक्कादायक माहिती यामुळे बाहेर आली.

याप्रकरणी ११ विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून महाविद्यालय प्रशासनानेही या विद्यार्थ्यांना पुढील तीन महिन्यांसाठी निलंबित केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -