घरदेश-विदेशभिकारी सर्च केल्यावर का येतो इमरान खानचा फोटो?

भिकारी सर्च केल्यावर का येतो इमरान खानचा फोटो?

Subscribe

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो गुगलच्या सर्च इंजिनवर भिकारी केल्यावर येत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो गुगलच्या सर्च इंजिनवर भिकारी केल्यावर येत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मथळ्याखाली पाकिस्तानच्या एका महिला पत्रकाराने तो फोटो आणि पाकिस्तानच्या संसदेने गुगलच्या सीईओंना पाठवलेल्या समन्सची प्रत पोस्ट केली. यामुळे इमरान खान यांच्यावर जगभरातून टीका करण्यात आली. तर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यावर पाकिस्तानकडून टीका केली. पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्या तिजोरीत परदेशी चलनाचा तुटवडा आहे. यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या पाकिस्तानला मदत मिळवून देण्यासाठी इमरान खान अनेक देशांकडे मदत मागत असल्याचे बोलले जात आहे.

वाचा : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे मोदींना पत्र

- Advertisement -

इमरान खानने मागितली मदत 

इमरान खान यांनी सौदी अरेबिया, चीन यासोबतच अनेक देशांकडे मदत मागितली असून सौदीने पाकिस्तानला ६ अरब डॉलर कर्ज देण्याची घोषणा केली आहे. चीननेही पाकिस्तानला आर्थिक मदत करणार असल्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानने आयएमएफकडेही मदतीची याचना केली आहे. तसेच पाकिस्तान सरकारनेही वायफळ खर्च टाळण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान झाल्यावर इमरान खान यांनी काटकसर म्हणून आपल्या ताफ्यातील अनेक आलिशान गाड्यांचा लिलाव केला होता. यामुळे जगासमोर पाकिस्तानची केविलवाणी अवस्था समोर आली. त्यानंतर जगभरात मदतीसाठी फिरणाऱ्या इमरान खान यांच्यावर मीम्सही बनवले गेले. पण गुगल सर्चनेही इमरान यांना भिकाऱ्यांच्या पंक्तीत बसवल्याने पाकिस्तानमध्ये संतापाची भावना आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -