lakhimpur kheri violence : लखीमपूर हिंसाचार प्रकरणी यूपी पोलिसांकडून दुसरी चार्जशीट दाखल, सात शेतकरी आरोपी म्हणून घोषित

या महिन्याच्या सुरुवातीला या प्रकरणाचा तपास करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने स्थानिक न्यायालयात पहिले ५,००० पानांचे चार्जशीट दाखल केले होते.

lakhimpur kheri case up police files second chargesheet
lakhimpur kheri violence : लखीमपूर हिंसाचार प्रकरणी यूपी पोलिसांकडून दुसरी चार्जशीट दाखल, सात शेतकरी आरोपी म्हणून घोषित

उत्तर प्रदेश पोलिसांनी लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात आज दुसरी चार्जशीट दाखल केली आहे. या चार्जशीटमध्ये सात शेतकऱ्यांसह एका ड्रायव्हर आणि दोन भाजपा नेत्यांवर हत्येचे आरोप करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी या प्रकरणी पहिली चार्जशीट दाखल करण्यात आली होती. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आपल्या एसयूव्ही कारखाली चार शेतकरी आणि एका पत्रकाराला चिरडले होते. त्यानंतर लखीमपूर खेरीमध्ये हिंसाचार उसळला होता. यावेळी भाजपच्या दोन कार्यकर्त्यांसह तिघांना बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर गाडी चालक आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.

लखीमपूर खेरी प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या पहिल्या चार्जशीटमध्ये केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहे. यूपी पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी आशिष मिश्रा आणि इतर 12 जणांना हत्येचे आरोपी म्हणून घोषित करत एफआयआर नोंदवला होता, परंतु सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर एका आठवड्याने केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला अटक करण्यात आली.

या महिन्याच्या सुरुवातीला या प्रकरणाचा तपास करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने स्थानिक न्यायालयात पहिले ५,००० पानांचे चार्जशीट दाखल केले होते. यादरम्यान विशेष तपास पथक हजारो पानांच्या चार्जशीटसह लखीमपूर खेरी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात पोहोचले होते. ही चार्जशीट एका मोठ्या बॉक्समध्ये दोन कुलूपांसह बंद करुन नेण्यात आली होती. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा तुरुंगात असलेला मुलगा आशिष मिश्रा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लखीमपूर खेरी येथे झालेल्या चार शेतकरी आणि एका पत्रकाराच्या हत्येचा प्रमुख आरोपी आहे. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला.